Pune News : पुणे : गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी तब्बल १५ मोबाईल चोरणाऱ्या दोन तरुणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी कात्रज तलाव परिसरातून बुधवारी (ता.२५) अटक केली आहे.
अर्जुन महादेव शेलार (वय-१८), प्रेम राजु शेलार (वय-२०, दोघेही रा. मु.पो. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune News) त्यांच्याकडून सुमारे २ लाख रुपये किंमतीचे १५ मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
२ लाख रुपये किंमतीचे १५ मोबाईल जप्त
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना माहिती मिळाली की, कात्रज तलाव येथे दोनजण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आले आहेत. (Pune News) त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. आरोपींकडे असलेल्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे १५ मोबाईल फोन मिळाले.
दरम्यान, आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी मोबाईल कात्रज, गोकुळनगर, कोंढवा भागातून चोरी केली आहे. तसेच हा गुन्हा गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी केला असल्याची आरोपींनी पोलिसांना कबुली दिली आहे. (Pune News) आरोपींकडून १५ मोबाईल जप्त केले असून एक गुन्हा उघडकीस आला आहे. तर १४ फोनबाबत तपास सुरु आहे.
हि कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गिरीश दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ , पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता , पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे, अभिजीत जाधव, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत, हर्षल शिंदे यांच्या पथकाने केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी तरुणाचा जागीच मृत्यू;