Pune News : पुणे : इंटरनेट केबल व्यावसायिकाकडे दर महिन्याला १० हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने शिवाजीनगर परिसरातील दीपबंगला चौकात असलेल्या एका हॉटेलमधून अटक केली आहे.
निखिल कांबळे (वय १९, रा. पांडवनगर), अतुल धोत्रे (वय २१, रा. जुनी वडारवाडी) आणि तेजस विटकर (वय २१, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेट व्यावसायिकाकडील कामगार पांडवनगर भागात केबल टाकत होते. (Pune News) त्यावेळी आरोपींनी कामगारांना या भागात काम करायचे नाही, अशी धमकी दिली.त्यानंतर व्यावसायिकाने आरोपींची भेट घेतली.
दरम्यान, आरोपींनी व्यावसायिकाला या भागात काम करायचे असेल तर दर महिन्याला दहा हजार रुपये खंडणी द्यावी लागेल, असे सांगितले. (Pune News) याबाबत व्यावसायिकाने गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला होता.त्यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींना शिवाजीनगर परिसरातील दीपबंगला चौकात असलेल्या एका हॉटेलमधून अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हि कामगिरी पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शंकर संपते, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे यांच्या पथकाने केली आहे.
Pune News : पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दुचाकी तरुणाचा जागीच मृत्यू;
Pune News : भुयारी मेट्रो कामगारांना धमकावून २० हजारांची लूट; कसबा पेठेतील घटना