Loni Kalbhor : लोणी काळभोर : पार्टीसाठी पैसे नसल्याने, रात्रीच्यावेळी दिवेघाटात एका दुचाकीस्वाराला बंदुकीचा धाक दाखवून लुबाडल्याप्रकरणी तिघांविरोधात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेत असलेल्या या तिघांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्यात इंदापूर येथील निलेश बनसुडे टोळीतील तीन गुंडांचा समावेश आहे.
याप्रकरणी टोळी प्रमुख निलेश मल्हारी बनसुडे (वय २६, रा. राजवेलीनगर चौक, बनसुडे मळा, इंदापूर), ओम सोमदत्त तारगावकर (वय २१, रा. महतीनगर, इंदापूर) आणि रोहित मच्छिंद्र जामदार (वय २३, रा. जामदार गल्ली, कसबा पेठ, इंदापूर) या तिघांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाली आहे.
वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, १० जुलै २०२३ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दिवेघाटात एका दुचाकीस्वाराला धाक दाखवून लुबाडल्याप्रकरणी या तिघांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Loni Kalbhor) काळेवाडी (ता. पुरंदर) येथून चारचाकीमधून सासवडमार्गे इंदापूरकडे परतत असताना पार्टी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने आरोपींनी हा प्रकार केला. याप्रकरणी या तिघांनाही ११ जुलै रोजी अटक झाली होती.
दरम्यान, या तीनही गुंडांची गुन्ह्यांची पार्श्वभूमी असल्याने महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली. (Loni Kalbhor) याप्रकरणी तिघांवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
टोळी प्रमुख निलेश मल्हारी बनसुडे याच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अडवणूक करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor : विश्वराज हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.अदिती कराड यांना नवदुर्गा पुरस्कार प्रदान