नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य श्री राम मंदिरात आयोजित रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रामजन्मभूमी बांधकाम समितीच्या सदस्यांनी बुधवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सायंकाळी 5.15 वाजता ही बैठक झाली. या बैठकीत चंपत राय, नृपेंद्र मिश्रा, गोविद गिरी यांच्यासह चार जणांचा समावेश होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्याची विनंती केली होती, जी पीएम मोदींनी मान्य केली आहे.
ट्विटरवर पोस्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होणे हे त्यांचे भाग्य आहे. ट्रस्टच्या सदस्यांसोबतच्या भेटीचा फोटोही पंतप्रधानांनी शेअर केला. विशेष म्हणजे भगवान राम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना एका भव्य समारंभात केली जाणार आहे. ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले की, या समारंभात सुमारे 10,000 लोकांना मंदिराच्या आवारात प्रवेश दिला जाईल. तसेच देशभरातील सर्व प्रमुख मंदिरांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातील.
हेही वाचा:
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी पुणे पोलिसांची आणखी एक मोठी कारवाई; रोझरी शाळेच्या संचालकाला अटक