लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील जिल्हा परिषद शाळा क्र. २ येथे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निपुण भोंडल्याचा कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता. २०) करण्यात आले होते.
शिक्षण परिषदेची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप यांनी दिली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेमाने यांनी केले. यावेळी सोनाली खंडाळे, सीमा साबळे, नजमा तांबोळी, सचिन कराड, नवनाथ तानमंद, महेश पवार, तुषार चौधरी, प्रीती कामठे, कांचन वेदपाठक, ढमाले, आयशा खान, आदि शिक्षक उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिक्षकांनी महाभोंडल्याच्या कार्यक्रमाचा आनंद लुटला.
या कार्यक्रमात भाषा, गणित, विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन उर्दू शाळा लोणी काळभोर क्रमांक ३ यांनी केली होती. यावेळी लाडपाबळ येथील उपशिक्षिका चित्रा गवारे, पूनम शिंदे, आश्लेषा महामुनी, यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
नऊ दिवस, नऊ दुर्गा हा उपक्रम शाळा माळवाडी कवडी येथे राबवला गेला. यात सोमवार पासून रोज एका कर्तबगार महिलेला बोलावून त्यांचा व त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला व त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले. मुलांनी त्यांची मुलाखत घेतली व मुलाखत लिहून घेतली. शिक्षण परिषदेत केंद्राचे सर्व शिक्षक उपस्थित होते.
दरम्यान, अंगणवाडी सेविका मालन साळवे, बँक कर्मचारी वसुधा जाधव, पेशंट – सोनाली कांबळे, ससून हॉस्पिटल सीनियर नर्स – निर्मला वेदपाठक, प्राथमिक आरोग्य केंद्र नर्स – केदारी, कराटे – आर्या बाळू बारवकर शाळेकडून या सर्वांचे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार नजमा तांबोळी यांनी मानले.