मुंबई : राज्यात पुन्हा एकदा जुन्या पेन्शन विषयीचा मुद्दा तापणार आहे. मागील संपानंतरही सरकारकडून कोणतीही सकारात्मक हालचाली होत नसल्याने आता राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी संघटनांची शनिवारी बैठक झाली. या बैठकीत संघटनांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला कर्मचाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. पुढील महिन्यात एक दिवसीय आंदोलनाने जुन्या पेन्शनसाठीच्या आंदोलनाची पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे.
सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटनांची शनिवार 21 ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे 18 नोव्हेंबरला राज्यव्यापी एकदिवसीय आंदोलन होणार आहे. जर या आंदोलनाची दखल घेतली नाही, तर 14 डिसेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण सरकारी- निमसरकारी कर्मचारी करणार आहेत. सरकारने आश्वासन देऊन ही कोणतीही कार्यवाही न केल्याने आणि सरकारी कर्मचारी शिक्षकांना जुनी पेन्शन पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा इत्यादी 17 मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी आंदोलन-संप करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
हेही वाचा:
IND Vs NZ: हार्दिक पंड्या न खेळणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे, प्लेइंग 11 मध्ये करावे लागतील बदल