Big Breaking News : पुणे : मुंबई आणि पुण्यात आतापर्यंत तब्बल ७०० ते ८०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर बोलले पाहिजे. ड्रग्ज तस्कर ललित पाटील हा एक मोहरा आहे. फडणवीस हे पाटील प्रकरणाचा गैरवापर राजकारणासाठी करत आहेत. एका ड्रग्ज माफियाची खातिरदारी सुरू आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे डोके ठिकाणावर आहे का? की त्यांनाही नैराश्याने ग्रासले आहे, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
पाटील प्रकरणाचा राजकारणासाठी गैरवापर
सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या जबाबातून अनेक धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत. तो सांगतोय की मला येरवड्यातून बाहेर काढलं. ससून रुग्णालयात ९ महिने ठेवलं. सरकारी पाहुण्यासारखी खातिरदारी केली. ससूनमधून मी पळालो नाही, तर मला मंत्र्यांच्या आदेशाने पळवून लावण्यात आलं. (Big Breaking News) पळून जाण्याचीही चोख व्यवस्था करण्यात आली. ससूनमधील डाॅक्टर आणि पोलीसांनाही पैसे दोवून मॅनेज केले, हे हा माफिया स्वत: कबूल करतोय. म्हणूनच माझा गृहमंत्र्यांना प्रश्न आहे, या प्रकरणावर तुम्ही शांत का आहात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
नाशिक आणि आजूबाजूचा परिसर ड्रग्जच्या विळख्यात सापडला आहे. महाराष्ट्राचा उडता पंजाब करण्याचा कट आहे. या विरोधात उद्या नाशिकमध्ये इशारा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात शाळकरी विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. देवेंद्र फडणवीसजी, आपण राज्याचे गृहमंत्री आहात. (Big Breaking News) आपल्या पदाला, प्रतिष्ठेला शोभेल, असे वागा. अशी आमची हात जोडून विनंती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे सरकारमधील दोन मंत्र्यांवर या प्रकरणी आरोप केले आहेत. त्यांची तत्काळ चौकशी करा. हिंमत असेल तर या दोन मंत्र्यांचे राजीनामे घ्या, असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : संगणकीकृत सातबारा उताऱ्यांमध्ये बदल करून जमिनी हडपल्या; मावळ, मुळशीतील प्रकार