Big News : पुणे : ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला चेन्नईत मुंबई पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने शनिवारपर्यंत (ता. २१) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, ललितची पोलीस कोठडी संपताच त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी ललित पाटील याची कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे अनेकजण गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ललितला कुणाचा राजकीय वरदहस्त होता, कोण मदत करायचे, याची माहिती देखील लवकरच समोर येणार असल्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे.
डॉक्टर आणि पोलीस गोत्यात येणार असल्याचे संकेत
दरम्यान, ललित पाटील पैशाच्या जोरावर ससून हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि पोलिसांना मॅनेज करत होता. ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी डॉक्टर आणि पोलिसांना तो सातत्याने पैसे देत होता. तसेच ससूनच्या बाहेर जाऊन बैठका घेत होता. (Big News) तेथूनच ड्रग्ज रॅकेट चालवत होता. ललितवर नजर ठेवण्यासाठी ससूनमध्ये पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. या पोलिसांना तो पैसे द्यायचा. ससूनच्या बाहेर अनेकदा त्याचा भाऊ भूषण पाटीलला तो भेटायचा. सातत्याने डॉक्टरांना मॅनेज करून तब्येत खराब असल्याचा अहवाल तो कोर्टात सादर करायचा, अशी माहितीही मिळत आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणात डॉक्टर आणि पोलीस सर्वच गोत्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ससूनमधून ड्रग्ज रॅकेट चालविणाऱ्या ललितने भाऊ भूषण व अन्य साथीदारांच्या मदतीने मुंबई, पुणे, नाशिकमध्ये मेफेड्रोनची विक्री केली होती. मलेशिया, थायलंड, दुबईत त्याने मेफेड्रोन विक्रीस पाठविले होते. मुंबई पोलिसांनी ललितला अटक केली आहे. (Big News) त्याची पोलीस कोठडी संपताच पुणे पोलीस बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ललितला अटक करणार आहेत. त्यादृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललितने नाशिकमधील मैत्रिणीकडून २५ लाख रुपये घेतले. चेन्नईतून तो श्रीलंकेत पसार होण्याच्या तयारीत होता. गेले पंधरा दिवस पुणे पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी दिवसरात्र तपास करत होते. (Big News) मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ललित पसार होता. चेन्नईतून त्याने मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधला. तांत्रिक तपासात ही माहिती मिळाल्यानंतर साकीनाका पोलिसांनी ललितला चेन्नईत पकडले.
ललित पाटीलला कुणाचा राजकीय वरदहस्त होता का? त्याला बाहेरून कोण मदत करत होतं याची चौकशी सुरू आहे. (Big News) तसेच त्याच्या संपर्कात कोण कोण होतं? त्याला ससूनमध्ये भेटायला कोण कोण यायचं? त्याच्याकडून कुणा कुणाला हप्ते जायचे? याचीही चौकशी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पुणे पोलीस मुंबईत आले आहेत. ललित पाटीलचे दोन सहकारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. या दोन्ही सहकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी पुणे पोलीस आले आहेत. (Big News) या दोघांचा पुणे पोलीस लवकरच ताबा घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं..