Pune News : पुणे : ड्रग तस्कर ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्याच्या दोन मैत्रिणींना पुणे पोलिसांनी नाशिकमधून अटक केल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे ललितची कसून चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या दोन महिला साथीदारांना अटक केली आहे. या दोघींनाही अटक करून भल्या पहाटेच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणी धक्कादायक खुलासे होणार असून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईतील न्यायालयाने ललित पाटीलला शनिवारपर्यंत (ता. २१) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ललित पाटीलला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी
नाशिक पोलिसांनी बुधवारी (ता. १८) प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोन महिलांना अटक केली होती. त्यानंतर आज भल्या पहाटे या दोघींना पुणे पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ललित पाटीलला पळून जाण्यात या दोन्ही महिलांनी मदत केली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस या दोन्ही महिलांची कसून चौकशी करत आहेत. ललित पाटील फरार होण्यापूर्वी एक दिवस आधी तो प्रज्ञा कांबळेकडे येऊन राहिला होता. (Pune News) प्रज्ञाने त्याला आश्रय देऊन फरार होण्यास मदत केली होती. यावेळी ललितने प्रज्ञाकडून २५ लाख रुपये घेतले होते. त्याने प्रज्ञाकडे चांदीही ठेवली होती. त्याची बेनामी संपत्ती प्रज्ञाकडे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रज्ञाला अटक केल्याने आता तिच्याकडून मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे. गेले १५ दिवस पुणे पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी दिवसरात्र तपास करत होते.
ललित पाटील याने ससून ते चेन्नईपर्यंत प्रवास कसा केला, त्याला आश्रय कोणी दिला, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. (Pune News) ललितला त्याच्या मैत्रिणींनी पसार होण्यास मदत केल्याची माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकाने दोघींना अटक केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : मेसेज पाठवल्याच्या वादातून तरुणावर शस्त्राने वार करुन खून; चौघांना अटक
Pune News : भाजप नेत्याच्या मदतीनेच ललित पाटीलने पलायन केले; आमदार रविंद्र धंगेकरांचा खळबळजनक दावा