Pune News : पुणे : स्वतः खरेदी केलेल्या फ्लॅटवर मूळ जागा मालकांनी अतिक्रमण केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार बांधकाम व्यावसायिकासह मूळ जागा मालकांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगावशेरी येथील टेम्पो चौकातील गौरी हाईट्स येथे मे २०१६ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
वडगावशेरीमधील प्रकार
याबाबत सचिन रविंद्र अपसिंगकर (वय-३९, रा. खराडी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune News ) त्यानुसार शेखर गलांडे, अमोल गलांडे, कविता गलांडे, दाजी गवारे (सर्व रा. वडगावशेरी), बांधकाम व्यवसायिक योगेश सुरेश घंगाळे यांच्यावर गुन्हा दाखल करुन, शेखर व अमोल गलांडे यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बांधकाम व्यावसायिक योगेश घंगाळे यांनी २०१२ मध्ये वडगावशेरी येथे मे. योगेश कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम साईट सुरु केली. येथील ३०३ क्रमांकाचा प्लॅट फिर्यादी यांनी २५ लाख ८० हजार रुपयांना खरेदी केला. या फ्लॅटचा दस्त बिल्डर जयेश घंगाळे याने करुन दिला होता. (Pune News ) मात्र, या जमिनीच्या मूळ मालकांनी संगनमत करुन फिर्यादीच्या फ्लॅटला परवानगीशिवाय कुलूप लावले.
दरम्यान, आरोपी असलेल्या मूळ जमीन मालकांनी अतिक्रमण केल्याने फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून आर्थिक फसवणूक केली. (Pune News ) याबाबत फिर्यादी यांनी चंदननगर पोलिसांकडे तक्रार दिली.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पालवे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : अजितदादांवर केलेल्या आरोपांमागे भाजपचा हात ; रोहित पवारांकडून अजित पवारांची पाठराखण..
Pune News : महिलेचे इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट तयार करून मागितली खंडणी ; पुण्यातील घटना..