Bhimashankar News : भीमाशंकर : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मंदिरात धक्कादायक घटना घडली आहे. मंदिरात गुरवांच्या दोन गटांत पूजेच्या अधिकारावरून जोरदार हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. या हाणामारीच्या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. (Bhimashankar News) पोलिसांसमोर हा प्रकार घडला असून, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुजाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..
भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर वसलेले असल्यामुळे निसर्गप्रेमींसाठीही हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. भीमाशंकर मंदिरात पूजा करण्यावरून पुजाऱ्यांमध्ये अनेक वाद आहेत. दरम्यान, सोमवारी नेहमीप्रमाणे भाविक दर्शनासाठी रांगेत उभे होते. (Bhimashankar News) त्यावेळी दुसऱ्या गटाचा जमाव मंदिराच्या गाभाऱ्यात शिरला आणि पुजेसाठी बसलेले पुजारी विजय भिमाजी कौदरे यांना दमदाटी करून पाटावरून उठवले. त्यांना शिविगाळ व धक्काबुक्की करन, हाताने तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, अशी तक्रार गोरक्ष यशवंत कौदरे यांनी दिली. या प्रकारावरुन एका गटाच्या १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मंदिरात पुजेच्या कारणावरुन खूर्ची आणि लोखंडी पाईप मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली. (Bhimashankar News) तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार शंकर कौदरे यांनी दिली आहे. याप्रकरणी शंकर कौदरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार २१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुजाऱ्यांमध्ये झालेल्या हाणामारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे यांना सांगितले की, पुजेच्या कामात अडथळा निर्माण करण्याचे काम काही जण करत आहेत. (Bhimashankar News) हे सर्व लोक आमचेच आहेत. या प्रकरणावर सामोपचाराने तोडगा काढण्यात येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : रस्त्यात खड्डे अन् खड्ड्यात पाणी; पिंपरखेड-देवगाव रस्त्याची दूरवस्था
Pune News : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी… भक्तीमय वातावरणात मानाच्या बाप्पांना निरोप!