लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आखण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या “माझी माती, माझा देश” या अभियानांतर्गत पाचगणी व परिसरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी अमृत कलशामध्ये पवित्र माती टाकत, पंचप्राण शपथ घेतली. या वेळी वीरांना वंदन करून विविध उपक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
विविध उपक्रम उत्साहात साजरे
पाचगणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्यास विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, या अभियानाची सुरुवात झाली. (Pachgani News) या वेळी अनिल भिलारे यांनी आणलेला कलश वाहनरथ उपस्थितांसह स्वीट मेमोरिज हायस्कूल, शाॅलम इंटरनॅशनल, बिलीमोरया हायस्कूल व नगरपालिका शाळा आदी शाळांच्या प्रांगणात दाखल झाला. कलश रथ दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेतील माती कलशात जमा केली.
या वेळी कासवड येथील सेवानिवृत्त मेजर दिलिप पवार यांनी विद्यार्थ्यांना देशसेवा व सैनिकांचे काम यावर मार्गदर्शन केले. (Pachgani News) विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, जय जवान जय किसान, छत्रपती शिवाजी महाराज की जय… अशा घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला होता. विद्यार्थ्यांनी मेजर पवार यांना युद्ध, अग्नीवीर यावर आधारित प्रश्न विचारले. पवार यांनी दारुगोळा व सैन्यात वापरली जाणारी हत्यारे यांची विद्यार्थ्यांना माहिती दिली.
प्रास्ताविकात संतोष कवी यांनी “माझी माती, माझा देश” या उपक्रमाचा उद्देश व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भारतीय सैनिकांप्रती असलेली संवेदनशीलता, सैनिकांच्या अतुल्य कार्याचा गौरव व दिल्ली येथे मोदींच्या विचारातून होऊ घातलेले हुतात्मा पार्क याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे मंगेश उपाध्याय यांनी सांगितले. (Pachgani News) या वेळी भाजपचे अनिल भिलारे, मंगेश उपाध्याय, पाचगणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मेहुल पुरोहित, वैशाली भिलारे, वंदना उतेकर, संतोष धनावडे, भूषण बोधे, रवी दानवले, विक्रांत जाधव, शेखर भिलारे, नारायण देवघरे, रुपेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. पंचप्राण शपथविधीनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणीतील शिवाजी चौकावर ‘तिसऱ्या डोळ्या’ची नजर; पोलिसांना मदत होणार
Pachgani News : विभागीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेत पाच जिल्ह्यांतील १,२५० स्पर्धकांची दमदार कामगिरी