New Mumbai : नवी मुंबई : लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील अल्पावधीत संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाली आहे. आपल्या नृत्याने तिने तरुणाईला वेड लावले आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, राडा, गदारोळ असे प्रसंग अनेकदा पहायला मिळतात. दरम्यान, नवी मुंबई येथे सोमवारी झालेल्या कार्यक्रमात असाच गोंधळ झाला. तिच्या कार्यक्रमात साप घुसल्याने आधी मोठा गोंधळ उडाला. त्यानंतर तरूणांनी धिंगाणा घालून कार्यक्रमातील खुर्च्यांची तोडफोड केली. मात्र, आता गौतमीच्या नृत्याची सापालाही भूरळ पडल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.
पहिल्याच कार्यक्रमात साप अन तुफान गर्दी, राडा
नवी मुंबईतील कामोठे मानसरोवर परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रम पार पडला. राष्ट्रवादीचे संघटक राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (New Mumbai) या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. तरुणांची तुफान गर्दी, खुर्च्या धरून नाचणे सुरू असताना अचानकच या कार्यक्रमात सापाने एन्ट्री घेतली आणि गौतमीच्या चाहत्यांचा एकच गोंधळ उडाला. दरम्यान, एका सर्पमित्राने साप पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचा धाक दाखवला तसंच कारवाई करत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना बाहेरही काढलं. मात्र, तोपर्यंत काही उत्साही तरुणांनी खुर्च्यांची तोडफोड केली. (New Mumbai) कामोठे भागात गौतमी पाटील पहिल्यांदाच आली होती. तरीही तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाल्याचे पाहण्यास मिळाले. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचा धाक दाखवावा लागला. पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी कारवाई करावी लागली आहे.
दरम्यान, गौतमी पाटीलने अनेकदा हे सांगितले आहे की, “माझ्या कार्यक्रमात राडा करायचा असेल तर येऊच नका”. मात्र, गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की त्यात राडा होणारच हे जणू काही समीकरणच झाले आहे. यामुळेच अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमांना परवानगीच नाकारण्याची नामुष्की ओढवली आहे. (New Mumbai) नवी मुंबईत गौतमी पाटीलचा हा पहिलाच कार्यक्रम होता, ज्यात राडा झाला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : बँकिंग क्षेत्रात एसबीआयचे ‘एक पाऊल पुढे…