मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टोलबाबतच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच मनसैनिकांनी पहिला टोलनाका पेटवून दिलाय. मुंबईतील मुलुंड टोलनाका त्यांनी पेटवला आहे. टोलनाक्यावर असलेल्या केबिनमध्ये पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सोमवारी ९ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे हलक्या वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे सर्व टोलनाके आम्ही जाळून टाकू, असं राज ठाकरे म्हणाले . त्यानंतर मनसैनिकांनी मुलुंड टोलनाका पेटवून दिल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
टोलच्या मुद्द्यावरुन मुंबईसह राज्यभरातील अनेक मनसैनिक आक्रमक झाले आहेत. मनसेचे ठाण्याचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर रस्त्यावर उतरुन टोलनाक्यांची पाहणी केली. अविनाश जाधव यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर धाव घेत आंदोलन देखील सुरु केलं. हलक्या वाहनांना विना टोल सोडण्याची मागणी त्यांनी केली.
हेही वाचा:
एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ: एमआयडीसी जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाने याचिका फेटाळली
क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार जाहीर
घसरणीला ब्रेक! सोन्याच्या दरात एक हजारांची वाढ