अरुण भोई
Daund News ; राजेगाव : शिवरत्न वीर जिवाजी महाले हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान अंगरक्षक होते. आपल्या राजावर निष्ठा कशी असावी, हे त्यांनी प्रतापगडाच्या लढाईत शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून दाखवून दिले. तेव्हा ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण कायमची रुढ झाली. शिवरत्न वीर जीवाजी महाले यांनी वडिलांकडून पहिलवानाचे धडे घेतले. दांडपट्टा चालवण्याचे शिक्षण घेऊन त्यात तरबेज झाले. त्यांचे गुण, निष्ठा प्रत्येकाने आत्मसात करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन जीवा सेना संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश साळुंखे यांनी केले.
जीवा महाले यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी
भिगवण-दौंड रस्त्यावरील शिवरत्न जिवाजी महाले चौकातील नवीन स्मारकाला जिवा महाले प्रतिष्ठानच्या व ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या वेळी गणेश साळुंखे बोलत होते. या वेळी सुभाष जाधव, सरपंच प्रवीण लोंढे, मुकेश गुणवरे, भारत खराडे, पोलीस पाटील महेश लोंढे, महादेव बगाडे, नवनाथ लोंढे, सोपान चोपडे, मनोज भोसले, शशिकांत वाघमारे, योगेश वाघमारे, अमोल मोरे, धोंडीराम वाघमारे, गणेश वाघमारे, दत्तात्रेय वाघमारे, गणेश साळुंके, (Daund News) अध्यक्ष दौंड तालुका नाभिक संघटना, मारूती पंडीत, महादेव साळुंके, भारत जाधव, नवनाथ सोनवणे, रवी गायकवाड, रवी बंड, अश्विनी बंड, बेबी कासवेद, विजय ताठे, रूपेश बंड, बजरंग सूर्यवंशी, वसंत लोखंडे, बबन जाधव, योगेश थोरात, चंद्रकांत लोखंडे, सागर माने, अक्षय माने आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना साळुंखे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचविताना दांडपट्टयाचा उपयोग जीवाजी महाले यांनी योग्य प्रकारे केला. सैय्यद बंडाने महाराजांवर तलवार उगारली तेव्हा जीवा महालेंनी दांडपट्टा काढून राजेंची सुटका केली. हा इतिहास विसरता कामा नये. निष्ठावन सैनिक कसा असतो हे जीवा महाले यांच्या कार्यातून दिसून येते. आपला जीव धोक्यात घालून राजेंचे प्राण वाचविले, (Daund News) त्यामुळेच अशा वीरांचे स्मारक आपणा सर्वांसाठी कायम प्रेरणादायी राहील.
या वेळी सुभाष जाधव, योगेश थोरात, गणेश साळुंखे, प्रवीण लोंढे यांनी जीवा महाले यांच्या पराक्रमाची माहिती दिली. या चौकाला त्यांचे नाव देऊन त्यांच्या पराक्रमाची आठवण म्हणून जिवाजी महाले चौक ओळखला जात आहे, असे जाधव म्हणाले. योगेश थोरात यांनी आभार मानले. (Daund News) याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी, सदस्यांनी स्मारकासाठी निधी दिला तसेच सर्व सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, राजेगाव (ता. दौंड) याठिकाणी जीवा महाले यांच्या स्मारकासाठी महाराष्ट्र शासनाने स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी दौंड तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणेश साळुंखे यांनी केली.