पुणे : भारतातील उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी हे आता अमेरिकेच्या एका कंपनीचे मालक बनले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजने (RIL) कॅलिफोर्नियास्थित कंपनी सेंसहॉक मधील 79.4% हिस्सा विकत घेतला आहे.
मुकेश अंबानी म्हणाले, “सेंसहॉकच्या सहकार्याने आम्ही जागतिक स्तरावर सौर प्रकल्पांसाठी सर्वात कमी LCoE (लेव्हल्ड कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी) वितरीत करण्यासाठी खर्च कमी करू, उत्पादकता वाढवू आणि वेळेवर कामगिरी सुधारू. हे एक अतिशय रोमांचक तंत्रज्ञान मंच आहे आणि मला विश्वास आहे की RIL च्या पाठिंब्याने Senshawk अनेक पटींनी वाढेल,”
सेंसहॉक कंपनीसोबत हा करार $32 दशलक्ष (सुमारे 255 कोटी रुपये) मध्ये झाला आहे. नियामक मंजुरीनंतर वर्षाच्या अखेरीस करार पूर्ण होण्याची शक्यता आहे. 2018 मध्ये स्थापन झालेल्या सेंसहॉक सौरऊर्जा निर्मिती उद्योगासाठी सॉफ्टवेअर-आधारित व्यवस्थापन साधने विकसित करते. कंपनी ऑटोमेशन वापरून सौर प्रकल्पांचे नियोजन आणि उत्पादन करण्यास मदत करते.
जामनगरमध्ये रिलायन्स फुली इंटीग्रेटेड न्यू एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टिम स्थापित करत असून यासाठी 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी 4 नवीन गिगा कारखाने बांधत आहे. एकामध्ये फोटोव्होल्टेइक पॅनेल बनवले जाईल. दुसरा कारखाना ऊर्जा साठवणुकीसाठी आहे. तिसरा कारखाना ग्रीन हायड्रोजन आणि इंधन सेल सिस्टमसाठी आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात एजीएममध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्ससाठी नवीन गिगा कारखान्याची घोषणा केली होती.