Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Asia Cup 2022 : पराभवानंतरही टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचणार? ; दुसऱ्या पराभवानंतर अशी बदलणार गणितं…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 7 September 2022, 10:25

पुणे : आशिया कपच्या सुपर फोर मध्ये भारतीय संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. भारताने श्रीलंकेला १७४ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी एक चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. या पराभवामुळे भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे.

भारताकडून रोहित शर्मा व रविचंद्रन आश्विन यांची खेळी दमदार ठरल्याने भारतीय चाहत्यांना विजयाच्या अपेक्षा होत्या पण श्रीलंकेच्या निसंका आणि मेंडिस या जोडीने अर्धशतकी खेळी खेळत विजयासाठी मोठे योगदान दिले. भारताच्या पराभवाने आता आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे का असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही बदललेली समीकरणं समजून घ्या.

सुपर-४ फेरीत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सामने खेळवले जात आहेत. या फेरीमध्ये हे चारही संघ एकदा एकमेकांसमोर येणार आहेत. भारताने या फेरीतील दोन सामने गमावले आहेत. मात्र अजूनही भारत पूर्णपणे स्पर्धेच्या बाहेर गेलेला नाही. ८ सप्टेंबर रोजी अफागणिस्ताविरोधात भारताची लढत होणार आहे. सर्वप्रथम, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने बुधवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघावर मात करणे गरजेचे आहे त्यानंतर, चांगला नेट रन रेट आहे याची खात्री करण्यासाठी भारताला गुरुवारी अफगाणिस्तानवर मोठ्या फरकाने प्रबळ विजय नोंदवावा लागेल.

 

तसेच श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघाने त्यांच्या अंतिम सुपर ४ टप्प्यातील सामन्यात पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचा पराभव करावा लागेल. यानंतर श्रीलंका ६ गुणांचा टप्पा गाठेल आणि भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी २ गुण असतील. टायब्रेक ठरवण्यासाठी नेट रन रेट लागू होईल आणि सर्वोत्कृष्ट रेट असलेला संघ सर्व प्रथम पात्र ठरेल,

भारताने जर नेट-रन रेट उत्तम ठेवून विजय मिळवला आणि पुढील सामन्यांमध्ये पाकिस्तानचा पराभव झाला तर भारताला अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळू शकते. उद्या ७ सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना होणार आहे. पाकिस्तानचे दोन सामने बाकी आहेत, जे श्रीलंका आणि अफगाणिस्तानसोबत होतील.

दरम्यान, सुपर-४ फेरीमध्ये गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळावला जाणार आहे. ११ सप्टेंबरला दुबईत आशिया चषकाचा अंतिम सामना होणार आहे. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला एका विजयाची गरज आहे, तर भारताला अफगाणिस्तानला हरवून मग इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

मांडवगण फराटा येथे एकाच रात्रीत १३ ठिकाणी दरोडा टाकणाऱ्या टोळीला यवत पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.