जळगाव: मागील 15 दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक लागला आहे. राज्यातील जळगावमध्ये एकाच दिवशी सोन्याच्या किमतीमध्ये हजार रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये सोन्याच्या दरात जवळपास दोन हजारांची घसरण झाली होती. आता त्यामध्ये एकाच दिवसात त्यामध्ये हजारांची वाढ झाली.
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत होती. पंधरा दोन हजार रुपयांची घसरण झाल्यामुळे पितृपक्ष असूनही सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली असल्याचं दिसून आले होते. मात्र गेल्या काही तासांपासून पऍलेस्टाईन आणि इस्त्राईल यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाचा परिणाम म्हणून सोन्याच्या किमतीत वाढ झाली. त्यामुळे एकाच रात्रीत गुंतवणूकदारानी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आपला मोर्चा वळवला. यामुळे घसरलेल्या सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.
हेही वाचा:
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला
Pune News : बोहरा समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झैनब पूनावाला यांचे निधन