बारामती (पुणे)- भारतीय जनता पक्ष (BJP) सोशल मिडीयाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी (संयोजक) जेष्ठ पत्रकार व पुणे प्राईम न्यूजचे संपादक जनार्दन गोवर्धन दांडगे (#Janardan Dandge) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जनार्दन दांडगे यांना मंगळवारी (ता. ६) रोजी बारामती येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी जनार्दन दांडगे यांच्या निवडीची घोषणा केली. जनार्दन दांडगे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपली भारतीय जनता पक्ष सोशल मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी (संयोजक) नियुक्ती करण्यात येत आहे. आपण आपल्या संघटन कौशाल्याने जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढवावे. युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि जास्ती जास्त युवकांना भाजपमध्ये सामील करण्यासाठी आपण अथक परिश्रम घ्याल, अशी अपेक्षा आहे. आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
बारामती झालेल्या कार्यक्रमात दौंडचे विद्यमान आमदार व जिल्ह्यातील पक्षाचे स्टार प्रचारक राहुल कुल, खडकवासलाचे आमदार भिमराव तापकीर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रोहिदास उंद्रे, इंदापुरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप दादा कंद, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, उपाध्यक्ष संदीप हरपळे, भाजपचे हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे जिल्हा सचिव धर्मेंद्र खांडरे, किरणभाऊ दुगाने, भाजप लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विशाल वेदपाठक, पुढारीचे पत्रकार जयदीप जाधव, लोकमतचे पत्रकार सुनील जगताप, राहुल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
जनार्दन दांडगे यांनी १९९३ ते १९९७ या काळात अखिल भारतीय विध्यार्थी परीषदेचे सक्रीय कार्यकर्ते म्हणुन काम केले असुन, हवेली तालुका भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस म्हणुनही त्यांनी काही काळ काम पाहिले आहे. जनार्दन दांडगे हे सध्या अखिल भारतीय पत्रकार परीषदेशी संलग्न असणाऱ्या पुणे जिल्हा सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष म्हणुन काम पहातात.
दरम्यान, निवडीनंतर बोलताना भारतीय जनता पक्ष (BJP) सोशल मिडीयाचे नवनिर्वाचीत जिल्हाध्यक्ष ((संयोजक)) जनार्दन दांडगे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी सोशल मिडीयाची जबाबदारी सोपवली, याबद्दल मी दोघांचाही मनापासुन आभारी आहे.
पत्रकार क्षेत्रात व सोशल मिडीयात काम करणाऱ्या माझ्या सारख्या सहकाऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पत्रकारांना एकत्र करण्याबरोबरच, त्यांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, रोहिदास उंद्रे, उपाध्यक्ष दादासाहेब सातव, प्रविण काळभोर, सरचिटणीस धमेंद्र खांडरे, हवेलीचे संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हात सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जास्तीत जास्त काम करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही जनार्दन दांडगे यांनी यावेळी स्पष्ट केले.