शेरखान शेख
Ranjangaon News : रांजणगाव गणपती, (पुणे) : बिबट्याबाबतची नागरिकांच्या मनात मोठी भीती निर्माण होत चाललेली असून बिबट्याशी संघर्ष न करता बिबट्याला जीवनाचा भाग बनवणे आवश्यक असल्याचे शिरुर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी व्यक्त केले आहे.
वन्यजीव सप्ताहानिमित्ताने बोरा कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम
शिरुर शहरातील चांदमल ताराचंद बोरा कनिष्ठ महाविद्यालय येथे शिरुर वन विभाग यांच्या वतीने वन्यजीव सप्ताहच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना शिरुर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप बोलत होते. (Ranjangaon News) यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, वनपाल गणेश म्हेत्रे, सीमा पालोदकर, वनरक्षक संतोष भुतेकर, चालक अभिजित सातपुते, रणजीत सूर्यवंशी, सचिन नरवडे, प्रा. शरद रणदिवे, डॉ. आयोध्या क्षिरसागर, प्रा. पल्लवी ताठे, सागर श्रीमंते यांसह आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नागरिकांनी बिबट प्रवण क्षेत्रात राहताना बिबट्या व मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी तसेच वाढणाऱ्या बिबट्याच्या संख्ये विषयी भीती न बाळगता त्यांच्याबरोबर सहजीवन कसे शक्य आहे. (Ranjangaon News) याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना देत अचानक बिबट्या समोर आल्यास कोणती खबरदारी घेतली पाहिजे याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवून सर्व माहिती पालकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांनी केले. विद्यार्थी व शिक्षकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन प्रबोधन केले आहे.
दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी ग्लोबल वॉर्मिंग व त्याचा वन्य जीवावर होणारा परिणाम विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा थोरात यांनी केले तर प्रास्ताविक महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डि. के. मांडलिक यांनी आणि यशस्विता वारे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ranjangaon News : शिक्रापुरात हरवलेली बालिका सोशल मिडियामुळे पालकांच्या स्वाधीन..
Ranjangaon News : जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत सेवाधाम विद्यालयाचे यश