राहुलकुमार अवचट
Daund News : दौंड : केंद्र सरकारच्या आवाहनानुसार संपूर्ण देशभर ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज सकाळी १० ते ११ या वेळात संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. या वेळी सुमारे ३ टन कचरा गोळा करण्यात आला.
सुमारे ३ टन कच-याचे संकलन
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने १ मार्च यादिवशी संपूर्ण देशभर स्वच्छता अभियान राबविण्यात येते. त्या अनुषंगाने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची शासनाने स्वच्छता दूत म्हणून निवड केली आहे. प्रतिष्ठानच्या (Daund News) वतीने दरवर्षी वृक्ष लागवड व संवर्धन, विहिर जल पुनर्भरण, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या विहिरीमधील गाळ काढणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे आदी उपक्रम निस्वार्थपणे राबवले जातात.
महास्वच्छतेसाठी प्रतिष्ठानच्या वतीने ५० श्री सदस्य आपले स्वतःचे फावडे, घमेले, झाडू, खुरपे आदी साहित्यासह उपस्थित होते. या वेळी कचरा उचलण्यासाठी एक ट्रॅक्टर ट्रॉली आणण्यात आली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राजेगावात स्वच्छतेचा जागर
Daund News : दौंड तालुक्यात कोतवाल पदासाठी आरक्षण सोडत जाहीर
Daund News : दौंडच्या ‘आरोग्यदूता’मुळे चिमुकल्या सानवीने घेतला मोकळा श्वास