लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेती व शेती पूरक व्यवसाय, उद्योगांसाठी नव्याने सुरु केलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून, सोसायटी अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपूरे यांनी केले.
गोडवली विकास सेवा सोसायटीची वार्षिक साधारण सभा संपन्न
गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामपंचायतीच्या सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे सभागृहात आयोजित गोडवली विकास सेवा सोसायटीच्या ६४ व्या वार्षिक साधारण सभेत राजपुरे बोलत होते. (Pachgani News) या वेळी गोडवली विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष आर. डी. मालुसरे, जिल्हा बँकेचे विभागीय विकास अधिकारी आर एल. निकम, विकास अधिकारी गजानन राजापुरे, आर. के मालुसरे, सरपंच मंगेश पवार, उपसरपंच विष्णू मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना राजापूर म्हणाले की, जिल्हा बँकेच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या सोसायट्यांमुळेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली असून, खेड्यातील जीवनमान उंचावले आहे.
या वेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष आर. डी. मालुसरे म्हणाले की, बँकेच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून, शेतकरी सभासदांची आर्थिक प्रगती होण्यासाठी व संस्था सक्षम करण्यासाठी सर्व संचालकांसह प्रयत्न करणार तसेच संस्था पातळीवर १०० टक्के वसूलीचे उद्दीष्ट असणार आहे.
सभेसाठी अध्यक्ष आर. डी. माधुसरे, उपाध्यक्ष अजित मोरे, संचालक अंकुश आबा मालुसरे, तुकाराम बापू मालुसरे, नामदेव रामचंद्र मालुसरे, सदाशिव मारुती मालुसरे, (Pachgani News) मधुकर यशवंत मालुसरे, हणमंत विष्णू मालुसरे, लक्ष्मण काळू मालुसरे, नितीन पवार, सुनंदा कृष्णा मालुसरे, इंदूमती विष्णू कोंढाळकर, किसनराव मालुसरे, एन. के. मालुसरे, नितीन मालुसरे, सुभाष मालुसरे, सचिव युवराज दुधाणे, सह सचिव लक्ष्मण जाधव व सर्व सभासद उपस्थित होते.
सचिव युवराज दुआणे यांनी अहवाल वाचन केले. अंकुश मालुसरे यांनी स्वागत केले. अजित मोरे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पाचगणी शहर व परिसरातील पाच दिवसांच्या गणपतीला भक्तिमय वातावरणात निरोप