साहेबराव लोखंडे
Shirur News : टाकळी हाजी : जुलै महिण्यापासून लांबत गेलेला पाऊस, श्रावणात देखील सरी न कोसळता अक्षरशः पाण्याचे तुषार आकाशातून पडत होते. त्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण होते. वातवारणातील वाढलेला उकाडा आणी ढगांनी केलेली गर्दी यातून जोरदार पावसाचे आगमन झाले. श्री गणेश व गौराईचे आगमन होताच गुरूवारी (ता. २१) शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.
गुरूवारी दुपारी साडेतीन नंतर अचानक बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. गुरूवारी आणि शुक्रवारी सलग दोन दिवस समाधानकारक पाऊस झाला . (Shirur News) यामुळे विहिरी आणि कूपनलिकांची पाण्याची पातळी वाढू शकते असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत.
गौराईंच्या पावलांनी मातीत ओलावा आल्याने परिसरात चैतन्य
पावसाळा संपत आला तरी समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होत होती. श्रावणातील सरींचा अनुभव सुद्धा घेता आला नाही. (Shirur News) गणपतीच्या आगमनाने पावसाची सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त होत असताना गौराईंच्या पावलांनी मातीत ओलावा आल्याने परिसरात चैतन्य खुलले आहे.
या हंगामातील पिके पाण्याअभावी धोक्यात असताना दोन दिवसांतील पावसामुळे आशेचा किरण दिसू लागले आहे. यामुळे या भागातील खात्रीशीर उत्पन्न देणारे डाळिंब पिकाचा बहार धरण्यासाठी शेतकरी जोमाने तयारीला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. (Shirur News) बाजरी पिकाला या पावसाने नवसंजीवनी मिळणार आहे. त्यातून बाजरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. पण काढणीला आलेले बाजरीच्या पिकाचे नूकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा पाऊस ऊसासाठी चांगला झाल्याचे अनेक शेतकरी बोलू लागले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : वळसे पाटील महाविद्यालयात महिला आरोग्य शिबिर संपन्न..
Shirur News : शिरूर तालुक्यातील फाकटे गावात रस्त्यासाठी आमरण उपोषण