Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वाबळेवाडी शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापक वारे गुरूजी अखेर दोषमुक्त! चौकशी समितीचा अहवाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 24 September 2023, 11:32

Pune News : पुणे : आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा प्राप्त झालेल्या वाबळेवाडी शाळेमधील तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी आरोप केले होते. त्यावर चौकशी समिती नियुक्ती केली गेली. या चौकशी समितीचा निकाल हाती आला आहे. अनियमितता प्रकरणात तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना पुणे जिल्हा परिषदेने दोषमुक्‍त केले आहे. वारे यांच्यावरील कोणतेही आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल विभागीय चौकशी समितीने पुणे जिल्हा परिषदेला सादर केला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी वारे हे दोषमुक्‍त असल्याचे आदेश प्रसिद्ध केले.

विभागीय चौकशी समितीने सादर केला आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल

वाबळेवाडी शाळेमधील मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांना वेगळी ओळख निर्माण करुन दिली. आंतरराष्ट्रीय शाळा दर्जाप्राप्त या शाळेने वाबळेवाडी पॅटर्न म्हणून राज्यात ओळख मिळवली. शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढवून आंतरराष्ट्रीय पातळीच्या सुविधा त्यांनी दिल्या. त्यांच्या कार्याची दखल देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी शाळेमधील तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांनी आरोप केले होते. (Pune News) या पार्श्‍वभूमीवर तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांचे तात्पुरते निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी लावली होती. वाबळेवाडी शाळेचा मुद्दा विधानसभेतही अनेकवेळा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: खुलासा करून हे प्रकरण अधिक लांबणार नसल्याची ग्वाही दिली होती. त्यावर चौकशी समिती नियुक्ती केली गेली. या चौकशी समितीचा निकाल आला आहे. त्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणाची तब्बल दोन वर्षे विभागीय चौकशी सुरू होती. अखेर विभागीय चौकशी समितीने वारे यांच्यावर झालेला हलगर्जीपणा, कर्तव्यात कसूर, प्रशासकीय कामात निष्काळजीपणासह कोणतेही आरोप सिद्ध होत नसल्याचे लेखी कळवले.(Pune News)  त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी वारे यांना सर्व आरोपांतून दोषमुक्त करून निलंबन कालावधी सेवाकाळ म्हणून गृहीत धरत असल्याचा आदेश नुकताच जारी केला. दरम्यान, वारे यांची खेड तालुक्‍यातील जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत बदली करण्यात आली आहे.

 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून शासनाचे आदेश नसतानाही शालेय प्रवेशासाठी देणगी रक्‍कम गोळा करणे, वर्गणी गोळा करणे, वर्गणी न दिल्यास शालेय प्रवेश नाकारणे, (Pune News) शाळा व्यवस्थापन समितीच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्‍त निधी संकलन करणे व खर्च करणे, प्रवेशावेळी घेतलेली रक्‍कम ग्रामस्थांना परत न करणे, निविदा न मागविणे, संशयास्पद आर्थिक व्यवहार करणे आदी आरोप करण्यात आले होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : सर्व कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना आता हेल्मेट बंधनकारक ; तब्बल 1744 कंपन्यांना आरटीओकडून नोटीसा

Pune News : माहिती अधिकार दिन सर्वत्र साजरा करावा; राहुलकुमार अवचट यांची मागणी

Pune News : पुण्यात फिनिक्स मॉलच्या सातव्या मजल्यावरुन पडून खासगी वित्तीय संस्थेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Gautami Patil : ... मला ह्योच नवरा हवा; गौतमी पाटीलने सांगितल्या मनातील जोडीदाराविषयीच्या भावना!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.