Pune News : पुणे : पुणे जिल्ह्यातील चार सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या असून यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर दोघांना जीवनदान मिळाले आहे. सर्पमित्रांना दंश होत असल्याने नागरिक भयभीत झाले असून सर्पमित्रांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू
पुणे जिल्ह्यातील बारामती येथील सर्पमित्र विजय यादव यांना १५ ऑगस्ट रोजी विषारी नागाचा दंश होऊन उपचारादरम्यान चार दिवसांनी विजय यादव यांचा मृत्यू झाला. त्यांच दरम्यान मोशी येथील सर्पमित्र नितील शेलकर यांनाहि विषारी नागाचा दंश झाला होता. मात्र त्याच्यावर उपचार होऊन ते पूर्णपणे बरे झाले होते.
सदर घटना ताजी असतानाच पुणे जिल्हा वन्यजीव सर्परक्षक असोशियनचे शहराध्यक्ष विनायक मुगडे यांनाहि विषारी नागाचा दंश होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या तिघा सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या घटना ताज्या असतानाच शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील नेचर गार्ड ऑर्गनायझेशन संस्थेचे सर्पमित्र गणेश टिळेकर यांना शिक्रापूर येथे साप पकडताना अतिविषारी घोणस जातीच्या सापाचा दंश झाला असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सदर दंश झालेले चारही सर्पमित्र कोणतीही सुरक्षितता न बाळगता साप पकडण्याचे काम करत होते. सर्पदंश झालेल्या चौघांपैकी गणेश टिळेकर यांना यापूर्वी तीन वेळा सर्पदंश झालेला असून देखील कोणत्याही सुरक्षिततेविना मोठ्या आत्मविश्वासाने साप पकडले आज सर्पमित्राच्या अंगलट आलेले असून अशा सर्पमित्रांवर वनविभाग वचक ठेवणार का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला असून आता तरी वनविभागाने सर्पमित्रांना समाज देऊन सुरक्षितता बाळगण्याबाबत समज देणे गरजेचे आहे.
पकडलेल्या सापाबाबत जनजागृती करावी..
सर्प पकडण्यासाठी जाताना शक्यतो एकट्याने जाऊ नये तसेच सर्प पकडण्यासाठी स्टिकचा वापर करावा, त्या सर्पाबाबत किंवा प्राण्याबाबत आपण रिस्पेक्ट देणे गरजेचे आहे. तसेच या पकडलेल्या सापा बाबत जनजागृती करावी. साप पकडल्यानंतर तो लोकांना हातळून दाखवू नये. विशेषतः सर्प पकडण्यासाठी जाताना तोंडात गुटखा नशा पाणी न करता जावे यामुळे सर्प पकडणाऱ्या व्यक्तीचे मनेविचलित होतात व दुर्घटना घडतात असे सर्प अभ्यासक निलीम कुमार खैरे यांनी सांगितले.