Pune News : रांजणगाव गणपती, ता.०६ :
भरकटलेल्या जगात नाही
संस्काराची जाण कुणाला,
तुळशीवरच्या त्या पणतीचे
जळणे मजला शिकवून गेले…
शाळेच्या व्हरांड्यात शांतता होती. आज सर्व शिक्षक स्टॅाप रूम मध्येच बसले होते. वर्गात मात्र आमच्यातलेच सहकारी मित्र शिक्षक बनून मुलांना शिक्षवत होते. सरांनी शिकवलेली कवीता सुरेल आवाजात गाऊन एक दिवस शिकविण्याचा अनुभव शिक्षक म्हणून आम्ही घेत होतो.
गुरुजनांप्रती आदराची व कृतज्ञतेची भावना
रांजणगाव गणपती ( ता. शिरूर ) येथील महागणपती ग्रुप ऑफ स्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा केला गेला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेचा ताबा घेतला होता. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून त्यांच्या प्रतीमेचे पूजन करत या दिवसाची सुरवात करण्यात आली. या दिवशी विद्यार्थ्यांनी वर्गांमध्ये जाऊन शिक्षकांच्या भूमिका पार पाडल्या.
विद्यार्थी वेगवेगळे विद्यार्थी शिक्षक वेगवेगळे विषय शिकवण्यामध्ये रममान झाले. विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवीन वळण देणाऱ्या गुरुजनांप्रती आदराची व कृतज्ञतेची भावना म्हणून शाळेत सर्वच गुरुजनांचा या दिवशी सन्मान करण्यात आला.
यावेळी महागणपती ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विकासजी शेळके, प्राचार्य अरविंद गोळे, पर्यवेक्षक निलेश पापळे, उपप्राचार्य अबेदा अत्तार, अक्षरनंदन गुरुकुल स्कूलच्या प्राचार्या वंदना खेडकर, महागणपती ग्लोबल स्कूलच्या प्राचार्या पद्मिनी कवठेकर, विभाग प्रमुख सोनाली नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का खेडकर व कावेरी पाचंगे यांनी केले. प्रणाली खेडकर यांनी आभार मानले.