Sangli News : सांगली : जेवणातील बासुंदीतून विषबाधा झाल्यामुळे जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रम शाळेतील जवळपास १७० विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. उलटी आणि मळमळचा त्रास सुरु झाल्यानंतर मुलांना माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले.
९० मुले मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उमदीमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील समता अनुदानित आश्रमशाळा चालवली जाते. सुमारे २०० विद्यार्थी या आश्रमशाळेत आहेत. यापैकी सुमारे १७० विद्यार्थ्यांना रविवारी रात्री उशिरा अन्नातून विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. जत तालुक्यातील उमदी गावात एका ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम होता. (Sangli News ) त्या कार्यक्रमांमध्ये शिल्लक राहिलेले जेवण उमदी गावातील समता आश्रम शाळा येथील मुलांना देण्यात आले होते. सायंकाळी मुलांनी ते जेवण खाल्ल्यानंतर उलट्या आणि मळमळ सुरू झाली. सध्या ही सर्व मुलं माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर ९० मुलांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना त्रास सुरू होताच तत्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ व जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तेथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चांगली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यातील जवळपास विद्यार्थ्यांना मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणि जत मधील काही रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. (Sangli News ) उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
जिल्हाधिकारी यांनी घटनेची माहिती व दखल घेतली असून, विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही उणीव ठेवू नये, अशा सूचना त्यांनी मेडिकल कॉलेजची यंत्रणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. तसेच, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना या घटनेची संपूर्ण चौकशी करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याच्या व दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.
एका डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये शिल्लक राहिलेले जेवण आणि बासुंदी उमदीमधील समता आश्रमशाळेतील दीडशे ते दोनशे मुलांना दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मुलांनी हे जेवण खाल्ल्यानंतर उलट्या सुरू झाल्या, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. (Sangli News ) विषबाधा झालेल्या आश्रमशाळेतील मुलांचे वय पाच वर्षांपासून ते १५ वर्षांच्या आतील आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Sangli News : कर्ज माफीच्या आशेने उचलला पैजेचा विडा; अर्धनग्न अवस्थेत भर रस्त्यात तरुणाची मिरवणूक
Sangli News : स्वत:वर गोळी झाडत सांगलीतील जवानाची आत्महत्या; कारण अस्पष्ट!