Pimpri News : पिंपरी, (पुणे) : द्राक्ष हे नाजूक पीक आहे. जागतिक तापमानवाढीमुळे अतिथंडी, उष्णतेच्या झळा, अवकाळी, गारपीटीसारख्या नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यापासून संरक्षण करण्यासाठी द्राक्षांच्या बागावर प्लास्टिकच्या आच्छादनाची गरज आहे. त्याकरिता राज्य सरकारने कमीत कमी ५० टक्के अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
वाकड येथे द्राक्ष परिषदेचे उद्घाटन
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वतीने आयोजित ६३ व्या द्राक्ष परिषद २०२३ च्या उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. वाकड येथे रविवारी झालेल्या परिषदेला फलोत्पादक संचालक डॉ. कैलास मोते, बागाईतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, राज्यात साडेचार लाख एकरावर द्राक्ष लागवड आहे. द्राक्षाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी राज्य, केंद्र शासनाचे धोरण आणि नाफेड संस्था हा महत्त्वाचा घटक आहे. नैसर्गिक आपत्ती आल्यास द्राक्ष शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते.(Pimpri News ) ते टाळण्यासाठी द्राक्षांच्या बागेवर प्लास्टिकच्या आच्छादनाची गरज निर्माण झाली आहे. आधुनिकेतचा विचार करणारा शेतकरी आहे. त्यामुळे इतर पीक घेणाऱ्यांपेक्षा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे.
बेदाणा (मणुके) उत्पादकांना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्याकडे साठा उपलब्ध आहे. कांद्याची चाळ उभारण्यासाठी केंद्र सरकार अनुदान देते. त्याप्रमाणेच बेदाणाचाळ उभारण्यासाठी अनुदान द्यावे. तयार द्राक्षावर अवलंबून न राहता बेदाणा हा चांगला पर्याय आहे. भारतात ३०० लाख मेट्रिक टन बेदाणाचे उत्पादन आहे. (v) अफगाणिस्तानमधून २५ हजार टन बेदाणा भारतात येतो. २७५ रुपये प्रतिकिलोप्रमाणे आयात होतो. देशाची एकंदर गरज पाहता त्याच्या ५० टक्केसुद्धा बेदाणा आपण तयार करत नाही. बेदाण्याची विक्री वाढविण्यासाठी गुणवत्तापूर्वक उत्पादन घेण्याची अतिशय गरज आहे.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात बेदाण्याची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे बेदाणा निर्मितीत वाढ होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याची जाहिरात केली पाहिजे. (Pimpri News ) इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड या देशात बेदाण्याची मागणी नाही. पण, गुणवत्ता, किंमतीमध्ये जागरूक राहिले तर अडचण येणार नाही, असेही पवार म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : भोसरीच्या सीमा बेलापूरकर यांची मनसेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी निवड
Pimpri News : अजित पवारांच्या पिंपरी महापालिकेतील बैठकीला शिवसेना, भाजप पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती