Pune News : पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. २८) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार
राज्य मंडळाने दहावीची परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत घेतली. (Pune News ) अतिवृष्टीमुळे तीन परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करून परीक्षा घ्यावी लागली.
दरम्यान, परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर विद्यार्थी-पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. (Pune News ) राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. http://www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर निकाल जाहीर होईल.
संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण उपलब्ध होतील, या माहितीची प्रत घेता येईल. निकालानंतर गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुणे बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह वडील जागीच ठार; चौघे गंभीर जखमी