Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : शेरखान शेख… पशु-पक्ष्यांची भाषा जाणणारा शिरूरचा अवलिया!

युनूस तांबोळीby युनूस तांबोळी
Sunday, 27 August 2023, 12:44

Shirur News : शिरूर : प्राणी व पक्षांची भाषा समजून घेणे, ही देखील एक कला आहे. या मुक्या प्राण्यांना जवळ घेऊन, आपुलकीचा, मायेचा स्पर्श केला की त्यांची भाषा समजून घेणे सोपे जाते. प्राणी देखील प्रेमाची भाषा जाणून माणसाशी जुळवून घेतात. शिरूर तालुक्यातील एका अवलियाने प्राणी-पक्षांची भाषा अवगत केली आहे. या मुक्या जिवांशी तो अगदी प्रेमाने हितगुज साधतो. शेरखान शेख असे या प्राणी मित्र अवलियाचे नाव आहे. वनविभागाच्या मदतीने तो निसर्गातील जखमी पक्षी, प्राण्यांवर उपचार करतो. अनेक पक्षी, प्राण्यांना पाळण्याचा अनोखा छंद देखील तो जोपासत आहे.

सर्पमित्र व प्राणी मित्र म्हणून परिचित

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शेरखान शेख यांना लहानपणापासून प्राणी-पक्षी पाळण्याचा छंद आहे. शिरुर तालुक्यात ते सर्पमित्र व प्राणी मित्र म्हणून परिचित आहे. सर्पमित्र म्हणून त्यांच्या नावाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. पशु-पक्षांबाबत शासनाचे कायदे बदलल्यामुळे आवड असताना देखील काही प्राणी व पक्षी पाळण्यास मर्यादा येतात.(Shirur News)  यामुळे शेरखान शेख यांनी अमेरिकन कन्नूर पोपट, सरड्यांच्या प्रजातीतील अमेरिकन इग्वाना, परदेशी पांढरे उंदीर, कोकाटील जातीचे पांढरे पोपट, फिंचेश यांसह पशु-पक्षी पाळले आहेत. सर्व पशु-पक्षांचे चांगल्या प्रकारे संगोपन करत त्यांची काळजी घेत आहेत. आजूबाजूचे अनेक नागरिक व युवक त्यांच्याजवळील प्राणी-पक्षी पाहण्यासाठी अनेकदा त्यांची भेट घेतात. पशु-पक्षांविषयी माहिती जाणून घेतात.

शेरवान शेख यांनी सर्प मित्र म्हणून वेगवेगळ्या प्रजातीच्या सापांना जिवदान दिले आहे. या सापांना वनात सोडण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. सध्या वनविभागाला सहकार्य म्हणून ते वनविभागाच्या रेस्क्यू टीममध्ये काम करताना पहावयास मिळतात.

 

याबाबत बोलताना शेख म्हणाले की, लहानपणापासून मला पशु-पक्षांची आवड आहे. परंतु शासनाच्या नियमानुसार आपण महाराष्ट्र वनविभागाच्या कायद्यांनुसार आपल्या भागातील कोणतेही पशु-पक्षी आपण पाळू शकत नाही. (Shirur News) माझा छंद जोपासण्यासाठी मी हे परदेशी पशु-पक्षी पाळल्याचे शेरखान शेख यांनी सांगितले.

निरूपद्रवी उंदीर
शिक्रापूर येथील शेरखान शेख यांनी पाळलेले पांढरे उंदीर हे माणसांमध्ये मिसळणारे, माणसांच्या आवाजावर बाहेर येणारे, अंगा-खांद्यावर खेळणारे असून, अन्य उंदरांप्रमाणे घरात कोणतेही नुकसान हे उंदीर करत नाहीत. उपद्रव नसलेले हे पांढरे उंदीर नागरिकांचे आकर्षण बनत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shirur News : बिबट्या-मानव संघर्षातून होणारे अपघात टळणार… की फक्त राजकारण होणार?

Shirur News : यात्रा-जत्रांमधून दिसणारी लोकनाट्य तमाशा ही शाश्वत अन् जिवंत कला

Shirur News : हरितक्रांतीसाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे; सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे आवाहन

युनूस तांबोळी

युनूस तांबोळी

गेल्या २२ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव व कार्यरत आहे. राज्याचा महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान २०१२ -२०१३ मध्ये व्दितीय क्रमांक, २०१४-२०१५ मध्ये जिल्हात प्रथम क्रमांक, कवठे येमाई भुषण पुरस्कार, आंबेगाव शिरूर मध्ये माजी गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान, शिरूर तालुका पदवीधर संघ करपे पुरस्काराने सन्मानित, सातारा येथील अंध अपंग संस्थेकडून गौरव, मराठी भाषा निमित्त मनसे कडून गौरव, गेली २० वर्षात लहान मोठ्या संस्थाकडून गौरव व सन्मानचिन्ह २ वर्षे संवाद वाहिनी या वृत्तवाहिनी सोबत कार्य, दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २० वर्षे कार्यरत, राजकारण, लेख, सदर, कवीता, या माध्यमातून लिखाण, फोटोग्राफी आणि व्हिडीयो यात विशेष प्रावीण्य , साम मराठी व इ सकाळच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे लिखाण सध्या पुणे प्राईम मधून पुन्हा लिखाणाची संधी मिळाल्याने कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Pune News : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार; राज्य मंडळाची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.