लहू चव्हाण
Pachgani News : पाचगणी : पाचगणी-वाई मुख्य मार्गावरील शेरबागनजिकच्या जागेतील अनधिकृत शेडचे पक्के बांधकाम पाचगणी नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने काढून टाकले.
पाचगणी नगरपालिकेची कारवाई
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील सुरुर-पोलादपूर राज्य मार्गावर शेरबाग नजिकच्या मोकळ्या जागेवर अनधिकृत शेडचे पक्के बांधकाम केलेली जागा महापालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आज (ता. २४ ऑगस्ट) दुपारी दोनच्या सुमारास नगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने अतिक्रमण मुक्त केली.
महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख अमोल पवार यांच्या उपस्थितीमध्ये कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत महापालिकेचे कर्मचारी रवींद्र कांबळे, (Pachgani News) सूर्यकांत कासुर्डे, अफजल डांगे, बाबू झाडे, सागर बगाडे, नाशीर शेख यांनी भाग घेतला.
या वेळी बोलताना मुख्याधिकारी निखिल जाधव म्हणाले की, या कारवाईमुळे वाई-पाचगणी रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. (Pachgani News) भविष्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूस कोणत्याही व्यवसायधारकांनी रस्त्यासमोर वा लगत अतिक्रमण करुन व्यवसाय सुरु करु नयेत तसेच वाहतूक कोंडी निर्माण करु नये, अन्यथा संबंधितावर तत्काळ कारवाई करण्यात येईल.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : एकल प्लास्टिक वापरावर पाचगणीत कारवाई; दोन दिवसांत २५ हजारांचा दंड वसूल