Pune News : पुणे : सर्वांना हादरा बसेल, आपली झोप उडेल, अशी दहशतवाद्यांची मोठी लिंक पुणे शहरात आहे. या संदर्भात माहिती जाहीर करण्यास मला मर्यादा आहेत. दहशतवाद्यांचे धागेदोरे कुठे कुठे जात आहेत, ते मी जाहीरपणे सांगू शकत नाही. तरी एवढेच सांगेन की, पोलिसांनी त्यांना पकडले त्यावेळी त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. तिसरा साथीदार फरार झाला. परंतु दोघांना पोलिसांनी पकडले. या संदर्भात तपासातून उघड झालेल्या माहितीमुळे आपली सर्वांची झोप उडेल, अशी ही साखळी पोलीस तपासातून उघड झाली आहे, असे सांगत पालकमंत्र्यांनी पुणे शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याची कबुली दिली.
दहशतवादी संघटनांना विदेशातून फंडींग
पुण्यात १८ जुलै रोजी पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली होती. त्यापूर्वी ३ जुलै रोजी मुंबई आणि पुण्यातून काही जणांना अटक केली होती. (Pune News ) यानंतर पुणे शहरात दहशतवादी कारवाया सुरू असल्याची अनेक उदाहरणे उघड होऊ लागली. या प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयएकडे गेला. यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रथमच जाहीरपणे मत व्यक्त केले. शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशवादी संघटनांशी पुण्यातील दहशतवाद्यांचे संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशवादी संघटनांशी पुण्यातील दहशतवाद्यांचे संबंध समोर आले आहे. (Pune News ) तसेच हे दशतवादी स्टुडंट इस्लामिक मुव्हेमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या बंद पडलेल्या संघटनांचे पुनर्जीवन
करत असल्याचेही तपासातून समोर आले आहे. या संघटनांना विदेशातून फंडींग मिळत आहे.
दरम्यान, याप्रकरणी इसिसचा हँडरल त्यांना हँडल करत असल्याचे तपासातून समोर आले होते. मुंबईतील तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साकीब नचान हा या प्रकरणात महत्वाचा दुवा उघड झाला आहे. शहरातील दहशतवादी प्रकरणाचा तपास प्रथम एटीएसने केले. (Pune News ) त्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एनआयएने तपासाची सूत्रे हाती घेतली. एनआयएने कोंढवा परिसरात दोन ते तीन वेळा छापाही टाकला. या छाप्यात दहशवाद्यांची प्रयोगशाळाच सापडली. त्यात बॉम्ब बनवण्याचे साहित्य होते. तसेच अनेक आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले होते.