Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking News : हडपसर पोलिस, वाहतुक पोलिसांच्यासह महानगरपालिकेचा अतिक्रमण विभागही बनले “ध्रुतराष्ट्र “.. हडपसर ते कवडीपाट टोलनाक्या दरम्यान अतिक्रमनामुळे “महामार्गाची” वाट लागली असतांनाही, वरील तीनही खाती आंधळ्या व मुक्याच्या भुमिकेत..

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Monday, 21 August 2023, 20:50

पुणे, ता.२१  : हडपसर (आकाशवाणी) ते कवडीपाट टोलनाका या दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर फळे, भाजीपाला व इतर चिजवस्तू विकणाऱ्या हातगाड्यांनी, टेंपोंनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. तर फुरसुंगी फाटा ते कवडीपाट या दरम्यान भाजीवाल्यांनी थेट रस्त्यात येऊन फळ व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. हे कमी की काय म्हणून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना रात्रंदिवस पार्क होत असलेली अवजड वाहने, यामुळे हडपसर (आकाशवाणी) ते कवडीपाट टोल नाका या दरम्यानच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे.

हडपसर (आकाशवाणी) ते कवडीपाट टोल नाका या दरम्यान दोन्ही बाजूच्या रस्त्यात येऊन फळ व भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या हातगाड्या, टेंपो, विविध प्रकारचे दुकानदार, फेरीवाले, भाजी विक्रेते, टेंपो याबरोबरच पार्क होत असलेली अवजड वाहने, महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना दिसतात; मात्र, अतिक्रमणे काढण्याची जबाबदारी असलेल्या हडपसर क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाला मात्र वरील बाब दिसत नसावी का, असा प्रश्न रस्त्यावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे. हडपसर (अकाशवाणी) ते कवडीपाट टोल नाक्या दरम्यान अतिक्रमणांमुळे महामार्गाची पुरती वाट लागली असतानाही वरील तीनही खाती आंधळ्याच्या व मुक्याच्या भुमिकेत वावरत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटू लागला आहे.

हडपसर (अकाशवाणी) ते कवडीपाट टोल नाका या दरम्यानच्या रस्त्याची वाट लागल्याने, पुणे-सोलापूर महामार्गावरुन लोणी काळभोर बाजूने पुण्याला तर पुण्याहून लोणी काळभोरकडे ये-जा करणाऱ्या स्थानिक नागरिकांना व बाहेर गावावरुन पुण्याला ये-जा करणाऱ्या प्रवासी वाहनांना या ठिकाणावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. हडपसर गावात पुलाखाली रस्त्यावर गर्दी ओसंडून वाहत आहे. अतिक्रमणचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. मात्र, हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेला अतिक्रमण विभाग मूग गिळून गप्प बसला आहे.

हडपसर-गाडीतळ ते गांधी चौक आणि मगरपट्टा चौक ते गाडीतळ दरम्यानचा पदपथ आणि सायकल ट्रॅक पुन्हा दुकानदार, फेरीवाले, भाजीविक्रेत्यांनी व्यापला आहे. आकाशवाणी ते पंधरा नंबर या दरम्यान रस्ता अरुंद असूनही, हडपसरवरून पंधरा नंबरकडे जाणाऱ्या रस्त्यावर फळांची विक्री करणाऱ्या गाड्या राजरोसपणे व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर मांजरी हद्दीतील मांजरी बाजारापासून रुकारी पेट्रोल पंपापर्यंत तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला फळ विक्रते, भाजी पाला विक्रत्यांनी रस्त्यातून चालणेही महाग करुन टाकले आहे.

 

हडपसर ते कवडीपाट या सुमारे पाच किलोमीटर रस्त्याचे तसेच पुणे-सोलापूर महामार्गाचे चार-साडेचार वर्षांपूर्वी रूंदीकरण झाले आहे. मात्र, या रुंदीरकरणाचा फायदा रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना न होता, तो फक्त रस्त्यावर फळे, भाजीपाला व इतर चिजवस्तू विकणाऱ्या हातगाड्या, विविध वस्तूंची विक्री करणारे टेंपो, टपऱ्या चालकानांच झाला आहे.

फुरसुंगी ते कवडीपाट या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंची जागा ही भाजीपाला व फळे विक्रेत्यांना कायदेशीर देऊनच टाकली, अशी परिस्थिती आहे. हडपसर ते कवडीपाट या सुमारे पाच किलोमीटर रस्त्यात वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि पादचाऱ्यांसाठीचे पदपथावरील अतिक्रमणे हटविण्याचे काम हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाने करणे अपेक्षित आहे. मात्र, हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभाग रस्त्यामधील अतिक्रमणांवर आर्थिक हितसंबंधामुळे डोळेझाक करत आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

‘हित’संबंधामुळे सर्वांचेच हात वर?

हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील सहायक आयुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख यांच्याकडे वारंवार तक्रार केल्यानंतर, त्यांच्याकडून ते काम आमचे नाही, पोलिसांचे आहे, असे सांगितले जाते. हडपसर पोलिसांना फोन केल्यास, पोलीस म्हणतात ते काम पालिकेचे आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार होणाऱ्या वाहतुक कोंडीचा व वाहतुक पोलिसांचा दूर दूर संबंध नसावा असेच वाहतुक पोलिसांचे वागणे असते. यामुळे वरील काम नक्की कोणाचे, यावर एखादी आंतरराष्ट्रीय संशोधन समिती नेमण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेवाळेवाडी बस डेपोसमोर (अधिकृत??) दुकानांची निर्मिती…

शेवाळेवाडी बस डेपोसमोर भिंतीलग रस्त्याच्या बाजूला मागील काही दिवसांपासून अनधिकृत पत्र्याच्या शेडमध्ये मांस विक्रीची दुकाने चालवली जात होती. मात्र, मागील १५ दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी १० ते १५ पत्र्याचे पक्के शेड उभारले गेले आहेत. या शेडमध्ये विविध प्रकारचे व्यवसाय चालू झाले असतानाही, त्या जागेचे मालक असलेल्या बस डेपोच्या अधिकाऱ्यांनी अथवा अतिक्रमण विभागाच्या प्रमुखांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही, ही बाब महत्वाची आहे. उद्या संबधित ठिकाणी दुकानदारांनी सिमेंट-क्रॉंक्रिटचे बांधकाम केल्यावरही, वरील अधिकारी दुर्लक्ष करणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

 

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

सोन्याच्या दराला पुन्हा ब्रेक! 30 सप्टेंबरला सोने-चांदी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

Wednesday, 30 September 2026, 10:35

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळ्यात मोठी कारवाई! जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक; प्रकरणाला नवं वळण

Wednesday, 30 September 2026, 10:27

WhatsApp वर प्रत्येक मेसेजसाठी मोजावे लागणार 14 पैसे! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम, पाहा कोणाला द्यावे लागणार पैसे

Wednesday, 30 September 2026, 10:23

सचिन वाझेची आज पुण्याला रवानगी? 5 जिल्ह्यांत प्रवेशबंदी; थेट NIAच्या ताब्यात जाणार?

Wednesday, 30 September 2026, 10:09

दुष्काळाच्या छायेत 305 तालुके! शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले मोठे निर्णय; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 30 September 2026, 8:37

दिवेघाटातून जाणाऱ्यांनो थांबा! आज 2 तास रस्ता पूर्ण बंद; नेमकी काय आहे कारण? वाचा

Wednesday, 30 September 2026, 8:25
Next Post

Pune News : पुण्यात दहशतवाद्यांची मोठी लिंक; पालकमंत्र्यांची माहिती; म्हणाले, ऐकूनच सर्वांना हादरा बसेल, झोप उडेल....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp