Pimpri News : पिंपरी : उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या निगडी परिसरात एका प्रसिद्ध हॉटेलच्या कॉमन शौचालयात मोबाइलने चित्रीकरण केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार हॉटेलमध्ये आलेल्या एका सजग नागरिकाच्या दृष्टीस पडल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी हॉटेलच्या वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हे प्रकरण पोलीस पैसे घेऊन दडपण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
पोलिसांकडून पैसे घेऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
शौचालयात फोनद्वारे चित्रीकरण करण्याचा प्रकार गंभीर असल्याने, हॉटेलमध्ये येणाऱ्या अनेक ग्राहकांनीदेखील संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. (Pimpri News ) उच्चभ्रू वसाहत म्हणून निगडी परिसर ओळखला जातो. या ठिकाणी मोठमोठी हॉटेल्स वसली असून, येथे ग्राहकांची सतत वर्दळ असते. अशाच एका हॉटेलमध्ये हा गंभीर प्रकार घडला आहे.
हॉटेलच्या महिला आणि पुरुषांसाठी असलेल्या शौचालयामध्ये वेटरने मोबाईल ठेवून चित्रीकरण केले. एक सजग ग्राहक शौचालयात गेल्यानंतर रेकॉर्डिंग सुरू असलेला मोबाईल त्याला आतमध्ये आढळला. (Pimpri News ) या प्रकरणी संतप्त होऊन त्याने हॉटेल मॅनेजमेंटला जाब विचारला. त्यानंतर मोबाईल कोणाच आहे, याची चौकशी सुरू झाली.
दरम्यान, चौकशीअंती संबंधित मोबाईल हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरचा असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. हे प्रकरण पैसे घेऊन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे. (Pimpri News ) परंतु नागरिकांच्या दबावानंतर संबंधित वेटरवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे निगडी पोलिसांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : मावळात गावठी हातभट्टीवर मोठी कारवाई
Pimpri News : मॉल, बंद दुकानांवर दरोड्याचा कोयता गॅंगचा प्रयत्न फसला; चौघांना अटक, एक फरार
Pimpri News : चोरी, घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आवळल्या मुसक्या