Pune News : पुणे : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर आरोग्य केंद्रातून एका धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना शस्त्रक्रियेनंतर दिवसभर चक्क जमिनीवर झोपवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निरगुडसर आरोग्य केंद्र राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या गावातील असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
निरगुडसर आरोग्य केंद्रातील प्रकार
निरगुडसर हे दिलीप वळसे पाटील यांचे गाव आहे. येथे ४८ महिला दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ३० निरगुडसर आणि १८ धामणी आरोग्य केंद्रात दाखल होत्या. (Pune News) महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर महिलांना खाली जमिनीवर झोपवण्यात आले.
याबाबत संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले की, शासन आमच्या दारी, योजनेअंतर्गत सामान्य जनतेला उत्तम आरोग्य सुविधा पुरविण्याचे सरकारचे धोरण आहे. (Pune News) मात्र, या आरोग्य केंद्रात साध्या सुविधा देखील उपलब्ध नाहीत. शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना योग्य सुविधा मिळत नसतील, तर सोबत आलेल्या नातेवाइकांचे काय? असा संतप्त सवाल नातेवाईकांकडून विचारण्यात येत आहे.
दरम्यान, याबाबतचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शस्त्रक्रिया होत असतील तर पेशंटची सोय बघणे देखील महत्त्वाचे आहे. (Pune News) शस्त्रक्रीया झालेल्या रुग्णाला खाली सतरंजीवर झोपवण्यास, आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
याबाबत बोलताना डॉ. शारदा मोरमारे यांनी सांगितले की, आज एकूण ४८ महिलांच्या शस्त्रक्रिया झाल्या असून, ऑपरेशनच्या पेशंटला भूल असल्याने आम्ही त्यांना गाद्या टाकून खाली झोपवले आहे. आम्ही दर महिन्याला अशा शस्त्रक्रिया करतो आणि अशाच प्रकारे खाली झोपवतो. (Pune News) कारण त्यांना भूल दिलेली असते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळणाऱ्या तिघांना 24 तासांत बेड्या; वारजे पोलिसांची कारवाई
Pune News : खंडणी उकळण्यासाठी तिने हॉटेल व्यावसायिकालाच ओढले जाळ्यात…