Baramati News : बारामती : शाळकरी वयात मित्रांसोबत सायकल चालवत शाळेला जाणे, ही मुलांसाठी एक पर्वणीच असते. काही जण शारीरिक तंदुरूस्तीसाठी सायकल चालवतात, तर काही जण हौस म्हणून दूरवर सायकल प्रवास करतात. हौसेला मोल नसते, असं म्हणतात, ते देखील खरंच आहे. आता हेच पहा ना, बारामती तालुक्यातील माळेगाव येथील तब्बल ७५ वर्षांच्या अवलियाने संपूर्ण सायकलच आरशाची बनवली आहे. त्यांच्या सायकलला १६ आरसे आणि ८ इंडिकेटर आहेत. परिसरात या सायकलची जोरदार चर्चा होत आहे. Baramati News
अनोख्या आरसे सायकलची बारामती तालुक्यात जोरदार चर्चा
कोल्हापुरातील ५५ वर्षांच्या संजय सांगळे यांना सायकल ‘मॉडिफिकेशन’चा छंद जडला आणि त्यांनी सायकलला इंडिकेटर, हॉर्न, चार्जर, रेडिओ आणि बरेच काही… लावून घेतल्याची जोरदार चर्चा झाली. आता बारामतीतील अवलिया याच कारणाने चर्चेत आला आहे. या अवलियाचे नाव आहे, उत्तमराव दादासाहेब माळवे… वयाच्या ७५ व्या वर्षी ते न थकता, उत्तम सायकल चालवतात. त्यांची सायकल पाहताक्षणीच कोणालाही कुतूहल वाटतं. अनेकजण या अनोख्या सायकलसोबत फोटो देखील टीपतात. Baramati News
माळवे हे महावितरण कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. व्यायाम म्हणून सायकल चालवण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे. ते दररोज माळेगाव खुर्दवरून बारामतीपर्यंत सायकल चालवतात आणि बारामतीवरून पुन्हा माळेगावकडे जातात. आपल्या अनोख्या सायकलविषयी बोलताना माळवे म्हणतात, मी सायकल चालवताना सर्वांनी माझ्या सायकलकडे पहावे, अशी माझी इच्छा आहे. या अनुषंगाने मी सायकलमध्ये अनेक बदल केले. सायकलला एक-दोन नाही, तर तब्बल १६ आरसे जोडले. माझ्या सायकलला आठ इंडिकेटर देखील आहेत. Baramati News
सांगळे पुढे म्हणाले की, मी वयाच्या ७५ व्या वर्षी देखील सायकल चालवल्यामुळे फीट आहे. मी सायकल चालवताना मला मोटरसायकलवाल्यांनी पहावं, असं मला वाटतं. अनेक लोक माझ्याकडे पाहतात ते केवळ सायकल चालवतो म्हणून नाही, तर एवढी विचित्र सायकल कशी बनवली आहे म्हणूनही पाहतात. या पाहण्यामुळे तरी किमान या वयात मी सायकल चालवतो हे लोकांना कळावे, हाच माझा एकमेव उद्देश आहे. दरम्यान, या अनोख्या आरसे सायकलची बारामती तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे. Baramati News