सागर घरत
Solapur News : करमाळा, (सोलापूर) : शेती पंपासाठी असलेल्या रोहित्रांमधील ऑइल सांडून सुमारे ३५ हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उमरड (ता. करमाळा) ग्रामपंचायत हद्दीतील लवखी नाल्याजवळ घडली आहे. गुरुवारी (ता. १०) सकाळी हि घटना उघडकीस आली आहे. (Solapur News)
चोरीचा तपास लावण्याची मागणी
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरड येथील नितीन भारत बदे यांच्या शेतात शंभर एचपी क्षमतेच्या विद्युत ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) आहे. बुधवारी रात्री आठची लाईट गेली होती. बुधवारी मध्यरात्रीच चोरी करून ट्रांसफार्मर वरून फेकून दिल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे. (Solapur News)
या रोहीत्रातील विद्युत ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल ॲल्युमिनियम कॉइल व इतर साहित्य अज्ञात चोरट्याने पळवून नेहले. चोरीनंतर महावितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन त्याचा पंचनामा केला असून पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवत असल्याचे सांगितले आहे. (Solapur News)
दरम्यान, सध्या तालुक्यात अशा प्रकारच्या चोरीचे प्रकार होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. उमरड येथे ट्रांसफार्मर साहित्याच्या झालेल्या चोरीचा तपास लावण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. यापूर्वी या भागातील विद्युत मोटारी केबल स्टार्टर अशा शेती साहित्याची चोरी होत होती परंतु सध्या ट्रांसफार्मर मधील साहित्याचीही चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांमधून या चोऱ्यांना कायमचा पायबंध घालण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली जात आहे. (Solapur News)