Pachagani News : पाचगणी : गावापासून शाळेत चार किलोमीटर पायी चालत जायचे, शाळेत जाताना जंगलातील चिखलाचा रस्ता तुडवायचा,कोणी आजारी पडले तर डोलीतून त्याला उचलून न्यायचं. हे धक्कादायक वास्तव आहे पर्यटन नगरी असलेल्या महाबळेश्वर पासून काही किमी अंतरावरील घोणसपूर या गावचे. ग्रामस्थांना बाराही महिने पायपीट करावी लागत आहे. वनखात्याची अडचण सांगणाऱ्या राजकारण्यांसमोर ग्रामस्थ हतबल झाले आहेत. (Pachagani News)
राजकारण्यांसमोर ग्रामस्थ हतबल;
घोणसपूर गाव हे मधु मकरंद गडाच्या पायथ्याशी आहे. येथील रहिवासी पिढ्यानपिढ्या जागृत देवस्थान जागेचे वतनदार आहेत. त्यांच्या कित्येक पिढ्यांचे वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधीकडे रस्त्यासाठी मागणी करून ही आजपर्यंत गावाला रस्ता झाला नाही. वन खात्याची अडचण सांगून लोकप्रतिनिधी हात वर करीत आहेत. (Pachagani News)
ग्रामस्थांनी गेल्या १५ वर्षांमध्ये श्रमदान करून कच्च्या स्वरूपात रस्त्याची व्यवस्था केली. स्वातंत्र्य भेटून ७५ वर्षे झाली, तरी सुद्धा ग्रामीण भागातील सर्व गावात, वाडी वस्ती जोडणारा कायमस्वरूपी डांबरी रस्ता नाही.
ग्रामस्थांनी इतके वर्षे जंगल संपत्ती जीवापाड जपली. (Pachagani News)
परंतु, नागरिकांच्या रहदारीची व्यवस्था करायला किचकट अशी वन खात्याची परवानगीचे प्रश्न राज्य सरकार, व केंद्र सरकार, कोणत्यातरी अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्नांमध्ये लोकप्रतिनिधी मांडेल का? असा प्रश्न घोणसपूर येथील ग्रामस्थ विचारत आहेत. (Pachagani News)
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वयोवृद्ध कुसुम संभाजी जंगम यांना लकवा मारल्याने महाबळेश्वर येथील रुग्णालयात नेण्यासाठी ग्रामस्थांना भर पावसात १२ किलोमीटर अंतर पायी चालावे लागले. एखादा ग्रामस्थ आजारी पडल्यास त्याला चादरींची झोळी करुन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जावं लागतं. (Pachagani News)
यादरम्यान एखादी गरोदर महिला दगावण्याची शक्यता असते, त्यामुळे याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
घोणसपूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ अजूनही आदिवासीचेच जीवन जगत आहेत. भारत आज विश्वगुरु बनन्याच्या गोष्टी करतो. परंतु, रस्त्या अभावी ग्रामस्थांना डालग्यात पेशन्ट टाकून महाबळेश्वरपर्यंत न्यावे लागत असेल तर या सारखे दुर्दैव काय असेल.?
डॉ. कुलदिप शिवराम यादव.