Nitin Desai News मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली. एनडी स्टुडिओमधील काही कर्मचाऱ्यांना गळफास लावलेल्या अवस्थेत नितीन देसाई आढळून आले. त्यातच त्यांची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. आता पोलिसांनी नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Nitin Desai News)
नितीन देसाई हे अनेक आठवडे कर्जबाजारी झाल्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णयही याचाच परिणाम असल्याचे मानले जात आहे. मात्र, नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एडलवाईस कंपनीच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी एक ऑडिओही रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये त्यांनी काही व्यावसायिकांची नावे घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. (Nitin Desai News)
देसाईंच्या पत्नीची पोलिसांत तक्रार
रायगडच्या खालापूर पोलीस ठाण्यात नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी या आत्महत्येप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Nitin Desai News)
ईसीएल फायनान्सकडून घेतले होते 185 कोटींचे कर्ज
नितीन देसाई यांच्या एनडी आर्ट वर्ल्ड लिमिटेडने 2016 आणि 2018 मध्ये ईसीएल फायनान्सकडून एकूण 185 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कोरोना काळापूर्वीच त्याच्या पैसे देण्यामध्ये अडचणी येत होत्या. दरम्यान, याबाबत नितीन देसाई यांच्या काही जवळच्या मित्रांना याची माहिती असल्याचे समोर आले आहे. (Nitin Desai News)