Cricket News : लंडन : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडसोबत आणखी एका खेळाडूने कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. अष्टपैलू क्रिकेटर मोइन अलीने पुन्हा एकदा कसोटीतून निवृत्तीची घोषणा केली. ॲशेस मालिकेच्या शेवटच्या सामन्यानंतर त्याने ही माहिती दिली. मोइन अलीने याआधीही निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, ॲशेस खेळण्यासाठी तो परतला होता. (Cricket News)
पुनरागमन केल्यानंतर खूप चांगले वाटत होते…
मोइन अलीने सामन्यानंतर बोलताना सांगितले की, हे खूपच अद्भुत असे होते. पुनरागमन केल्यानंतर खूप चांगले वाटत होते. मला स्टोक्सचा मेसेज आला तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला होता. मला माहिती नव्हते की, लीचला दुखापत झाली. पण मालिकेत मी पुनरागमनाचा आनंद लुटला. मला माहिती होते की हे मानसिकदृष्ट्या कठीण असेल. पण त्याहून जास्त शारीरिकदृष्ट्या आव्हानात्मक असणार होते. मी ही मालिका कधीच विसरणार नाही. मी विचार केला होता की माझे शेवटचे कसोटी सामने असतील आणि संघासाठी काही करेन. (Cricket News)
कधीतरी थांबणे गरजेचेच;
मी याआधीही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केलीय. त्यामुळे हे खूप चांगलं होतं. यापुढे कसोटी खेळणार नाही. मला माहितीय माझं काम केलंय. जर स्टोक्सने पुन्हा मेसेज केला तर मी तो डिलिट करेन. माझे काम झाले. हा वेळ खूपच चांगला गेला. पण मला माहिती आहे की माझ्यासाठी फक्त इतकेच आहे असेही मोईन अलीने म्हटले. (Cricket News)