Health News : कला प्रकारात वेळ घालवणेही मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकते. कला मानवी जीवनाचा आधार आहे आणि तिचा दिनचर्येत समावेश करणे खूप आवश्यक आहे. कलेतून तणाव कमी होतो, मूड चांगला होतो आणि भावनिक संतुलन राखण्यात मदतही मिळते.(Health News)
कला प्रकारात वेळ घालवणेही मेंदूसाठी फायदेशीर ठरू शकते.
वाढत्या वयासोबत कलेत वेळ घालवल्यास लोकांना याचा फायदा होऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये झालेल्या एका संशोधनात समोर आले की, सुमारे 20 मिनिटांच्या आर्ट ॲक्टिव्हिटीमुळे आयुर्मान वाढण्यास मदत मिळते. संशोधनानुसार, महिन्यात एक आर्ट ॲक्टिव्हिटीचा समावेश करून आयुष्यमान वाढवले जाऊ शकते. दररोज 20 मिनिटांची आर्ट ॲक्टिव्हिटी 8 तासांच्या झोपेसमान फायदेशीर असते. तुम्ही दिवसभर आर्ट ॲक्टिव्हिटी करण्यात सक्षम नसाल तर तुम्ही ती दिनचर्येत सहज सहभागी करू शकता.(Health News)
नृत्य, शिलाई काम, स्वयंपाक करणे किंवा आर्ट गॅलरीत जाण्यासारख्या सोप्या पद्धती आहेत. बऱ्याचदा कला आणि शिल्प मुलांचा खेळ असल्याचे लोक मानतात. मात्र, प्रत्येक वयाचे लोक कलेतून फायदा प्राप्त करू शकतात. त्यामुळे तुम्हीही आर्ट ऍक्टिव्हिटीकडे लक्ष द्यावं, हे आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते.(Health News)