Daund News यवत : दौंड तालुक्यातील रेल्वेच्या संबंधित असलेले प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली आहे. (Daund News)
दिल्ली येथे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. दौंड तालुक्यातील रेल्वेच्या संबंधित असलेल्या प्रश्नांवर वैष्णव यांच्याशी चर्चा केली आहे. हे प्रश्न तातडीने सोडवावेत अशी निवेदनाद्वारे मागणी केली. यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते. (Daund News)
आमदार कुल यांच्या मागण्या
दौंड तालुक्यातील खुटबाव, कडेठाण व कानगाव येथे रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल उभारण्यात यावेत.
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या सहजपूर, खामगाव (ता. दौंड) येथील उड्डाणपुलाचे काम तातडीने हाती घेण्यात यावे.छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (सीएसएमटी) – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दौंड जंक्शन येथे थांबा देण्यात यावा.
दरम्यान,दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे. व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड यादरम्यान लोकल सेवा सुरु करावी. दौंड मेमू लोकल वेळेवर धावत नसल्याची तक्रार वारंवार येत आहेत याबाबत प्रशासनाने योग्य कार्यवाही करावी.