पौड, (पुणे) : जमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई व त्याच्या 10 ते 15 सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुर्वेवाडी – दारवली, (ता. मुळशी) येथे घडली आहे.
ही घटना दारवली परिसरात मंगळवारी (ता. ०१) सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात १० ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पौड पोलिसांनी यात हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई सह सहा जणांना मंगळवारी (ता. १) उशिरा अटक केली असल्याची माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी दिली आहे.
याप्रकरणी प्रदिप शिवाजी बलकवडे वय- ३५, व्यवसाय-शेती रा. दारवली, ता.मुळशी) यांनी पौड पोलीस ठाण्यात मारहाण केल्याची तक्रार दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी धनंजय देसाई, रमेश जायभाउ, श्याम सावंत, रोहित पुर्ण नाव माहीत नाही रा. दारवली ता. मुळशी इतर अनोळखी १० ते १५ साथीदारांवर गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दारवली ता. मुळशी ग्रामपंचायत हद्दीत प्रदीप बलकवडे व त्यांचे कुटुंबीय राहतात. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास प्रदिप बलकवडे हे गावातील सचिन संभाजी ठोंबरे यांचे घरात बसले होते. यावेळी वरील आरोपी व त्यांचे काही साथीदार हे पिस्टल, तलवार, लोखंडी रॉड, काठया घेऊन त्या ठिकाणी आले.
यावेळी रमेश जायभाय, श्याम सावंत, रोहीत व त्याचे इतर १० ते १५ साथीदारांनी घरात घुसून बलकवडे यांना बाहेर ओढत आणुन ‘‘ तु तुझी जमीन धनंजय देसाई यांना लिहुन दिली नाहीस तर तुला व तु तुझ्या पुर्ण कुटूंबाला खलास करून टाकण्यास आम्हाला सांगितले आहे म्हणाले.
जमीन लिहुन देण्याचे कारणावरून बलकवडे यास श्याम सावंत याने पिस्टल दाखवुन व इतरांनी तलवार, लोखंडी रॉड, काठया घेवुन ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यात मारून दुखापत केली आहे.
दरम्यान, रस्ताने येणारे जाणारे लोकांना हातातील तलवार व कोयते दाखवुन येथे थांबला तर तुमचे काही खरे नाही असे म्हणुन दहशत पसरवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी धनंजय देसाई सह सहा जणांना अटक केली असून बाकीच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास
तपास पोलीस निरीक्षक मनोज यादव करीत आहेत.