Mumbai News : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. १) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, शरद पवार यांनी मोदींसोबत एकाच व्यासपीठावर बसू नये, असे मत महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आहे. पवार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटातून नाराजीचे सूर उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आज ज्येष्ठ पुरोगामी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे.
पवार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटातून नाराजीचे सूर
विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींनी पुरस्कार स्वीकारावा, यासाठी रोहित टिळक यांनी शरद पवार यांनाच मोदींना विनंती करायला सांगितली होती. (Mumbai News) त्यामुळे पवार पुण्यातील ज्येष्ठ मंडळींची विनंती लक्षात घेता मंगळवारी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणार की मोदींसाठी कार्यक्रमाला जाणार? हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता शरद पवार यांनी या कार्यक्रमाला जाणं टाळावं, असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्यानंतर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, गांधीवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. “शरद पवारांनी पंतप्रधान मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित राहू नये. (Mumbai News) तुम्ही जर उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात तर देशात वेगळा संदेश जाईल,” असं कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांना सांगितलं आहे.
यावर शरद पवार यांनी हा कार्यक्रम टाळता येणार नाही, असे उत्तर दिल्याची माहिती मिळत आहे. कारण हा पुरस्कार स्विकारावा, अशी विनंती शरद पवार यांनीच मोदी यांना केली होती, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या भूमिकेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमाला शरद पवार यांच्या उपस्थितीला काँग्रेस, राष्ट्रवादी (पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. एकीकडे मोदींना पुरस्कार दिला जात असताना, त्याचवेळी मंडईमध्ये ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांच्या नेतृत्वात विविध संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी आंदोलन करतील. (Mumbai News) तत्पूर्वी पुण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगताप तसेत ठाकरे गटाचे नेते पवारांची भेट घेऊन आपण या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी विनंती करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असेल. पुणे दौऱ्यात पंतप्रधान मोदी पुणे मेट्रोच्या नव्या टप्प्यासह विविध योजनांचे उद्घाटन करणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : जयपूर-मुंबई पॅसेंजर एक्स्प्रेस गोळीबार; आरोपी चेतन सिंह जीआरपीच्या ताब्यात
Mumbai News : अजिंक्य रहाणेचा चाहत्यांना मोठा झटका ; ‘या’ संघाकडून खेळण्यास नकार!