महेश सूर्यवंशी
Leopard Attack News : देऊळगाव राजे, (दौंड) : शिरापूर (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याचे हल्ले सुरूच असून रविवारी (ता. ३०) पहाटे दोन शेळ्यांवर हल्ला करून मारून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे.(Leopard Attack News)
ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याचे हल्ले सुरूच.
शेतकरी दत्तात्रय वाघमारे असे नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.(Leopard Attack News)
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय वाघमारे हे शेतीपरीसरात राहतात. त्यानी दोन शेळया या गोठ्यात बांधल्या होत्या. यावेळी बिबट्याने गोठ्यातच हल्ला करून दोन्ही शेळ्या मारल्या आहेत. दोन दिवांपूर्वीच गणेशनगर शिरपूर येथे रहात असलेल्या सुभाष होलम यांचा एक बोकड व एका शेळी वर हल्ला करून बाजूला शेतात नेऊन खाल्ल्या. तसेच रविवारी दोन शेळ्या मारल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.(Leopard Attack News)
दरम्यान, वनक्षेत्राचा परिसर जास्त आहे आणि वनक्षेत्रा लगत असणाऱ्या शेती मध्ये शेतीतील कामे करावी कशी असा सवाल शेतकऱ्यांपुढे आहे. तसेच वाड्या वस्त्या गावापासून अंतरावर असल्या कारणाने नागरिकांना तसेच शाळकरी मुलांना गावाकडे ये जा करणे मुठीत जीव धरून करावे लागत आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थांमधून होत आहे.(Leopard Attack News)
रात्रीच्या वेळी शेतात एकटे जाणे टाळावे..
देऊळगाव राजे आणि शिरापुर परिसरात घडत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना पाहता पोलीस पाटील सचिन पोळ यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शक्यतो शेतात जाणे टाळावे आणि दिवसाही सोबती घेऊनच जावे तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना बंधिस्त शेड मध्येच बांधून ठेवावे असे आवाहन केले आहे.