MLA Ashok Pawar News : शिरूर, (पुणे) : वाबळेवाडीच्या शाळेत 25 हजार रुपये घेऊन प्रवेश दिला जातो, असा आरोप आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत केला होता. त्यांच्या याच आरोपामुळ वाबळेवाडीचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत. या ग्रामस्थांनी थेट आमदार पवारांनाच गावात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे.(MLA Ashok Pawar News)
25 हजार प्रवेश फी घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.
वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेत सर्रास 25 हजार प्रवेश फी घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात आणि मुख्याध्यापकांसह बाहेरच्या दोन व्यक्ती हे पैसे स्वीकारतात. याशिवाय सीएसआरमार्फत होणाऱ्या कामाच्या फंडाचा हिशोब जिल्हा परिषद देत नाही. वाबळेवाडीतील 10-20 मुलेच स्थानिक आणि बाकी धनदांडग्यांची मुले या शाळेत जात असल्याचा दावा आमदार पवार यांनी गुरुवारी विधानसभेत केला होता. त्यांच्या याच दाव्यावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यांनी ही सर्व माहिती खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचे सांगत वाबळेवाडीतील ग्रामस्थ-पालकांनी तातडीची पालकसभा घेत पवारांना गावबंदी घातली आहे.(MLA Ashok Pawar News)
…तर तोंडाला काळे फासू
शिरूर येथील वाबळेवाडी शाळेप्रकरणी ग्रामस्थांनी तातडीने पालक ग्रामसभा घेत आमदार अशोक पवारांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसेच यापुढे वाबळेवाडीबद्दल बोललात तर पुणे-नगर महामार्गावर त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन तर करुच शिवाय दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराच वाबळेवाडीच्या महिलांनी दिला.(MLA Ashok Pawar News)
याबाबत बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले, “मला गावबंदी करणारे हे सर्वच्या सर्व हे वाबळेवाडी शाळेतील मुख्यध्यापकांच्या जवळ बसून २५ हजार रुपये पैसे गोळा केले आहेत. तसेच काहींना पावत्या दिल्या आहेत. तसेच काहींना पावत्या दिल्या नाहीत. गावबंदी करायला निघालेले पहिल्यांदा आत्मपरीक्षण करा. हे पैसे गोळा केलेले कोणत्या खात्यात टाकले ते सांगा. नसेल तर गावबंदी करणाऱ्यानी कोठेही बोलवा मी त्या ठिकाणी यायला तयार आहे. काही महिलांचे दोन वर्षापासून पैसे अडकले त्या महिलांचे पैसेही मिळवून दिले आहेत. वाबळेवाडीतील शाळेत बोटावर मोजण्याइतकीच मुले स्थनिक आहेत. मात्र बाकीची मुले हि धनदांडग्यांची आहेत.”