Pune News : पुणे : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. २८) हि घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
ओम कापडणे (वय – २०, रा. नाशिक) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव असून वडारवाडी येथील विष्णू कुंज वसतिगृहात त्यानी आत्महत्या केली आहे. ही माहिती मिळताच हेल्परायडर्स संघटनेचे पंकज घरडे आणि अभिजित मेश्राम घटनास्थळी पोहोचले. (Pune News ) ओमला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी रुग्णालयात तपासून त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ओम हा नाशिक येथील असून पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीच्या (भौतिकशास्त्र) तिसऱ्या वर्षांत शिकत होता. तो पुण्यातील विष्णू कुंज वसतिगृहात राहत होता. (Pune News ) गुरुवारी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. ओमने जिथे घळफास घेतला तिथे घटनास्थळी कुठलं पत्र वगैरे आढळून आलेलं नाही.
दरम्यान, ओमने आत्महत्या का केली याबाबत सध्या काहीही माहिती मिळू शकलेली नाही. (Pune News ) पोलिस सध्या या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं असे चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : चासकमान कालव्याचे पाणी करंदीत दाखल, ताशाच्या गजरात ग्रामस्थांनी साजरा केला आनंद