राहुलकुमार अवचट
Rahul Kul : यवत, (पुणे) : अवयवदान चळवळ मोठ्या प्रमाणात राबवून जनजागृती करावी अशी मागणी दौंडचे आमदार यांनी आज विधानसभेत केली.पावसाळी अधिवेशन २०२३- वेगवेगळ्या व्याधींमुळे मानवी अवयव निकामी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.(Rahul Kul)
मानवी अवयव निकामी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
राज्यातील सुमारे ५ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू अवयव निकामी झाल्याने झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. इंग्लंड, अमेरिका, हॉंगकॉंग व जपान या देशात ज्याप्रमाणे मृत मानवी शरीर हे शासन संपत्ती जाहीर केले जाते त्याप्रमाणे आपल्याकडे देखील मृत मानवी शरीर शासन संपत्ती जाहीर करून मृत शरीरातील अवयव काढून अनेक रुग्णांचे प्राण वाचवता येऊ शकतात.(Rahul Kul)
दरम्यान, अवयवदान चळवळ मोठ्या प्रमाणात राबवून त्याचा प्रचार व प्रसार करण्याबाबत शासनाने कार्यवाही करावी अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभा सभागृहात केली.