Pune News : पुणे : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांचा मध्यंतरी आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्याची घटना घडली होती. याबाबत राज्यातील विरोधकांनी आक्रमक होत किरीट सोमय्या यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. या सर्व घडामोडी घडत असतानाच आज किरीट सोमय्या पुणे दौर्यावर आले होते. या वेळी संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला.
पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात आंदोलन
पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात ‘सोमय्या गो बॅक’चे फलक घेऊन पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. (Pune News ) या वेळी कार्यकर्त्यांनी सोमय्यांना काळे झेंडे दाखविले.
दरम्यान, सोमय्या हे आज पुणे दौर्यावर असून, ते पर्वती येथील भाजप पदाधिकारी पुष्कर तुळजापूरकर यांच्या घरी जेवण करण्यास येणार होते. (Pune News ) पण त्यापूर्वी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे कार्यकर्त्यांसह पर्वती येथील गजानन महाराज मंदिर चौकात आंदोलन करण्यासाठी थांबले होते.
किरीट सोमय्या यांच्या जाण्याच्या मार्गावर कोणतीही अनुचित घटना घडू नये, या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (Pune News ) मात्र, किरीट सोमय्या यांच्या गाडीच्या दिशेने धावत कार्यकर्त्यांनी ‘सोमय्या गो बॅक’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तोडफोड करून दहशत माजवली तेथेच काढली धिंड; पुण्यासह नाशिकमध्ये समाजकंटकांचे धाबे दणाणले!