संदीप टूले
Daund School News : दौंड (पुणे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत पुणे जिल्ह्यात दौंड तालुका निच्यांकी स्थानी गेला असून दौंडच्या खालोखाल फक्त दुर्गम भोर तालुका आहे. Daund School News
भोरने गुणवत्ता यादीत तळ गाठला असला तरी निकालाची टक्केवारी सुधारल्याचे दिसते. मात्र या शिष्यवृत्ती परीक्षेमुळे दौंड तालुक्यातील शिक्षण पद्धतीवर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेने दौंड तालुक्यातील शिक्षणाचे व शिक्षकांचे पितळ उघडे पडले. Daund School News
दौंड तालुक्यात एकूण २३२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यातील फक्त २१६ विद्यार्थी पास झाले असून २१०४ विद्यार्थी हे नापास झाले आहेत. यात शिष्यवृत्तीधारक फक्त ५ आहेत. आणि टक्केवारी तर भोर पेक्षाही कमी फक्त ९.३१ टक्के. त्यामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहणे खूप गरजेचे आहे कारण येणारी पिढीचे भविष्य घडवण्यासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे.